Viral Bank Manager Remark : बँक मॅनेजरचा अजब फतवा, म्हणाला तुम्ही पतीला पटवून देता, तसे...

12 May 2025 11:11:45

viral
 
नागपूर : ( Viral Bank Manager Remark ) उच्च न्यायालयाने भारतीय स्टेट बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-यांविरुद्ध सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या अधिका-याने बँकेच्या कर्मचा-यांच्या आढावा बैठकीत 'तुम्ही तुमच्या पतीला पटवून देता, तसे ग्राहकाला पटवून द्या' असे विधान केले होते. त्यानंतर बँकेतीलच लिपिकेने अपमान करण्याच्या उद्देशाने विधान केल्याची तक्रार नोंदवली होती. या अधिका-याने गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. दीर्घ युक्तिवादानंतर अर्जदाराच्या विधानाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता आणि वापरलेले शब्द विनम्रतेचा अपमान करणारे नव्हते. त्यामुळे हे वर्तन 509 आयपीसी अंतर्गत गुन्हा घडत नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश दिले.
 
भारतीय स्टेट बँकेत सहाय्यक ( Viral Bank Manager Remark ) महाव्यवस्थापक (एजीएम) पदावर कार्यरत असलेल्या अर्जदाराने कलम 482 सीआरपीसी अंतर्गत अर्ज दाखल करून त्याच्या विरुद्धचा गुन्हा रद्द करण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली होती. हे प्रकरण भंडारा जिल्ह्यातील असून, त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 509 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर तक्रारदार देखील याच बँकेत वरिष्ठ लिपिक आहे, तिने 11 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या आढावा बैठकीत, तिच्या कामगिरीवर असमाधानी असलेल्या एजीएम यांनी वादग्रस्त विधान केले होते.
 
कामात सुधारणा व्हावी यासाठी बोलले
 
याचिकाकर्त्यांचे वकील ए. पी. मोडक यांनी युक्तिवाद केला की, कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा व्हावी, यासाठी हे शब्द वापरले होते. आणि यात त्यांना अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. तसेच, घटनेनंतर खूप उशिरा तक्रार दाखल करण्यात आली. दुसरे म्हणजे हे शब्द कदाचित अपमानजनक असतील, पण ते गुन्हेगारी स्वरूपाचे नाहीत. सरकारी वकील मयुरी देशमुख आणि आयुषी डांगरे यांनी युक्तिवाद केला की, अर्जदाराचे शब्द अपमानजनक आणि वाईट होते. ते इतर कर्मचाऱ्यांसमोर बोलले असून, यातून महिलेचा अपमान करण्याचा ( Viral Bank Manager Remark ) हेतू स्पष्ट होतो आहे.
 
उच्च न्यायालयाचे निरीक्षण
 
न्यायालयाने सांगितले की, जर एखाद्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करायचा असेल, तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली, आरोपीचा उद्देश महिलेचा अपमान करण्याचा असला पाहिजे. तर दुसरी, तो अपमान काही बोलून, आवाज काढून, हावभाव करून, तिला दिसेल अशा वस्तू दाखवून किंवा तिच्या खासगी गोष्टीत ढवळाढवळ करून झाला असावा. यावेळी न्यायालयाने दोन आदेशांचा दाखल ( Viral Bank Manager Remark ) दिला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, फक्त बोलणे किंवा काही करणे पुरेसे नाही, तर त्यामागे महिलेचा अपमान करण्याचा किंवा तिला दुखवण्याचा विचार असणे आवश्यक आहे. तसेच, पंजाबमधील एका खटल्याचा दाखला देत न्यायालयाने म्हटले की, गुन्हा ठरवण्यासाठी आरोपीचा हेतू किंवा त्याला त्या कृत्याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे, महिलेला काय वाटले हे नाही. प्रत्येक वेळी हे तपासले पाहिजे की एका सामान्य माणसाला असे वाटेल का की हे कृत्य महिलेच्या आदराला धक्का पोहोचवण्यासाठी किंवा तसे होण्याची शक्यता ( Viral Bank Manager Remark ) आहे हे माहीत असून केले गेले आहे.
 
Powered By Sangraha 9.0