Test Tube Cow Revolution : गायींच्या जन्मात वैज्ञानिक क्रांती ! टेस्ट ट्यूब बेबी प्रकल्पाची थक्क करणारी कामगिरी

13 May 2025 20:51:09
 
cow 1
 
नागपूर : ( Test Tube Cow Revolution ) वंध्यत्वावर उपचार म्हणून कायमच 'टेस्ट ट्यूब बेबी' या वैज्ञानिक पद्धतीकडे बघितल्या गेले. पण हेच संशोधन झपाट्याने नष्ट होणा-या भारतीय गायींच्या प्रजाती वाचविण्यासाठी फायदेशीर ठरते आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रजनन शास्त्राच्या प्रयोगशाळेने टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यामातून पाच वर्षांत तब्बल 114 गायींना जन्म दिला आहे. तसेच आजच्या घडीला येथील 88 गायी गाभण आहेत. महत्त्वाचे म्हणजे अनुभव आणि अत्याधुनिक संशोधनातून गायींच्या गभर्धारणेचा ( Test Tube Cow Revolution ) टक्काही 11.40 वरून 32.12 वर पोहचला आहे.
 
पशु विज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा फायदा नष्ट होत जाणा-या भारतीय गायींच्या प्रजाती वाचविण्यासाठी व्हावा, यासाठी केंद्र सरकारने डिसेंबर 2020 मध्ये राष्ट्रीय गोकुल मिशन जाहीर ( Test Tube Cow Revolution ) केले. या अंतर्गत माफसु विद्यापीठात 2021 मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू झाली. माफसुचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा. डॉ. मनोज पाटील यांच्यावर प्रजनन प्रयोग शाळेची धुरा सोपविण्यात आली. आज येथे डॉ. डी. एस. रघुवंशी, डॉ. ए. पी. गावंडे, डॉ. एम. एस. बावस्कर, डॉ. एस. ए. इंगळे आणि डॉ. ए.एम. शेंडे योगदान देत आहेत.
 
महाराष्ट्रात केवळ एक प्रयोगशाळा
 
डिसेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने देशात 31 पशुविज्ञान प्रयोगशाळांना परवानगी दिली. प्रत्यक्षात यातील 19 सुरू झाल्या. तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या निरुत्साही धोरणाचा फटका बसल्यामुळे ( Test Tube Cow Revolution ) यातील राज्याच्या वाट्याला केवळ एका प्रयोगशाळेचे भाग्य लाभले. ही प्रयोगशाळा तेलंगखेडी भागात आहे.
 
अशी आहे प्रक्रिया
 
उत्कृष्ट गाईची निवड केली जाते. गाईच्या बरगड्यांचा आकार, पाठीवरील चरबीचे प्रमाण तपासले जाते. गाय निरोगी असणे आवश्यक असते. गरजेनुसार आहार, जंतुचे औषध दिल्या जाते. प्रयोगशाळेत स्त्रीबीज जास्त प्रमाणात असलेल्या सहेवाल, गीर, गवाळू, डांगी आणि देवनी प्रजातीच्या दाता गायी आहेत. अल्ट्रासाऊंडच्या मदतीने गाईच्या अंडाशयातून स्त्रीबीज गोळा केले जाते. लॅबमध्ये स्त्रीबीज व बैलांच्या शुक्राणूचा संगम घडवला ( Test Tube Cow Revolution ) जातो. 7 दिवसांत गायीचे भ्रूण तयार होतो. हे भ्रूण विना शस्त्रक्रीया गायीच्या गर्भाशयात सोडले जातात. 45 दिवसानंतर गायीची गर्भ चाचणी करण्यात येते, त्या गायीला सरोगेट गाय संबोधले जाते. सरोगेट गायीचे योग्य संगोपन राखले जाते, 9 महिन्यांनी वासराचा जन्म होतो.
 
या प्रयोगाचा फायद असा की गायीच्या नैसर्गिक गर्भधारणेच्या माध्यमातून गाय ही केवळ एका वासरूला जन्म देऊ शकते. परंतु, टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून गायीच्या एका स्त्रीबिजातून 32 ते 40 वासरांचा जन्म होतो. या माध्यमातून वेगाने चांगले गाय-बैल तयार होऊ लागले असून, अंडाणू गोठवून भविष्यासाठी जतन करता येतात.
 
गायींच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी 'टेस्ट ट्यूब बेबी'चा प्रयोग मोलाचे पाऊल ठरणार आहे. माफसूची प्रयोगशाळा उत्पादन दरात देशातील दुस-या क्रमांकावर असून, विद्यापीठ स्तरावर प्रथम क्रमांकावर आहे. देशाच्या हृदयस्थानी असलेल्या या प्रयोगशाळेचा सर्वच राज्यांना मोठा फायदा होईल हे निश्चित.
 
- डॉ. मनोज पाटील, प्राध्यापक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ.
Powered By Sangraha 9.0