Trump India Pakistan Remark : ट्रम्पचा आगाऊ सल्ला ! भारत पाकने एकत्र डिनर करावं ?

15 May 2025 10:53:33

tr
 
वॉशिंग्टन : ( Trump India Pakistan Remark ) भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या तणाव आहे. या परिस्थितीत भारताने वारंवार नकार देऊनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबरदस्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही देशांमधील वाद सोडवण्यासाठी ते जबरदस्तीने आपले नाक खुपसण्याचा प्रयत्न करीत आहेत. सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या उपस्थितीत झालेल्या यूएस-सौदी गुंतवणूक मंचाला संबोधित करताना ट्रम्प यांनी दावा केला की, दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील संभाव्य अणुयुद्ध टाळण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
 
सौदी अरेबियातील भाषणादरम्यान ट्रम्प ( Trump India Pakistan Remark ) दरम्यात हे ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडील युद्धबंदीचे वर्णन त्यांच्या सरकारची शांतता प्रस्थापित करणारी कामगिरी म्हणून केले. पुढे त्यांनी सल्ला देत, भारत आणि पाकिस्तानने एकत्र डिनरला जावे जेणेकरून तणाव आणखी कमी होईल. महत्वाची बाब अशी की, भारताने वारंवार सांगितले आहे, पाकिस्तानशी फक्त पीओके आणि दहशतवादावरच चर्चा होईल, आम्ही दुसऱ्या कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही. तरीही ट्रम्प याबाबत विधाने करत आहेत.
 
ट्रम्प आपला बागुलबुवा वाजवत ( Trump India Pakistan Remark ) पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच, माझ्या प्रशासनाला भारत आणि पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक युद्धबंदी करण्यात यश आले. आम्ही या युद्धबंदीत व्यवसायाचा शस्त्र म्हणून वापर केला. मी सांगितले, चला काही व्यापार करूया. अणु क्षेपणास्त्रांचा नव्हे, तर तुम्ही सुंदर निर्मित केलेल्या गोष्टींचा. दोन्ही देशांमध्ये खूप मजबूत आणि बुद्धिमान नेते आहेत. आता सर्व थांबले असून, अपेक्षा आहे की ते असेच राहील. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्याकडे वळून म्हटले, मला वाटते की भारत आणि पाकिस्तान आता खरोखर चांगले जुळवून घेत आहेत. आपण त्यांना आणखी थोडे जवळ आणू शकतो. त्यांना एकत्र जेवायला का पाठवू नये ? ते किती छान होईल ? असेही ते म्हणाले.
 
भारताची तीव्र प्रतिक्रिया - आम्हाला मध्यस्थी नको
 
भारत सरकारने पुन्हा एकदा ट्रम्प ( Trump India Pakistan Remark ) यांच्या या विधानाला पूर्णपणे नाकारले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी ही पूर्णपणे दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन महासंचालक (डीजीएमओ) यांच्यातील परस्पर संवादाचा परिणाम आहे. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती.
Powered By Sangraha 9.0