Colonel Qureshi Controversy : माफी की राजीनामा ? कर्नल कुरेशी प्रकरणात राजकारणाचं नवं वळण

17 May 2025 17:22:25
 
colonel r
 
भोपाळ : ( Colonel Qureshi Controversy ) कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मध्य प्रदेशचे आदिवासी व्यवहारमंत्री विजय शाह यांच्या विरोधात सर्वत्र निदर्शने केली जात आहेत. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसने त्यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरत आहे. भोपाळमध्ये या आंदोलनाचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मिंटो हॉलमधील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काळे कपडे घालून काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांनी मंत्री विजय शाह यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. आमदार मसूद म्हणाले, तीन दिवस उलटूनही भाजपाने सैन्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. यावरून काळात की पक्षाच्या बोलण्यात आणि करण्यात जमीन आसमंताचा फरक आहे. मुख्यमंत्री म्हणतात की एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण तो न्यायाधीशांच्या आदेशानंतर दाखल ( Colonel Qureshi Controversy ) करण्यात आला आहे.
 
मध्य प्रदेशचे विरोधी पक्षनेते उमंग सिंघर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांच्या ( Colonel Qureshi Controversy ) शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. यानंतर, काँग्रेस आमदार काळे कपडे घालून राजभवनाबाहेर निदर्शने करत आहेत. सुमारे एक तास निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी काँग्रेस आमदारांना जबरदस्तीने उचलून नेले. अटक केली. नंतर त्यांना सोडण्यात आले. काँग्रेस आमदारांनी म्हटले की, हा सरकारचा खरा चेहरा आहे.
 
भोपाळमध्ये काँग्रेस नेते बेश्रमाच्या झाडाची रोपे घेऊन मंत्री शाह यांच्या बंगल्यावर पोहोचले. येथे त्यांनी गेटवर हंडे ठेवले आणि घोषणा दिल्या. मनोज शुक्ला म्हणाले, मंत्री विजय शहा यांच्यासमोर शरण गेलेले सरकार आणि भाजप न्यायालयाच्या सततच्या सूचना असूनही कारवाई करण्यात निष्काळजीपणा करत आहेत. काँग्रेसच्या मागणीबाबत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सांगितले आहे की, हे प्रकरण न्यायालयात आहे. आम्ही निर्णयाची वाट पाहत आहोत. न्यायालयाचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय आहे.
 
मध्य प्रदेशचे आदिवासी व्यवहारमंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांची माफी मागितली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणते वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणते वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरत आहे. कर्नल कुरेशी प्रकरणात वाद चिघळला असून विरोधकांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माफी मागितल्याने वाद शांत होईल की राजकीय तणाव वाढेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले ( Colonel Qureshi Controversy ) आहे.
 
Powered By Sangraha 9.0