मुंबई : ( Sanjay Raut On ED ) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजप सरकारसोबत केंद्रीय यंत्रणांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांचा सरकारवर आरोप आहे की केंद्र सरकारने विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर सुरू केला आहे. अनेक नेत्यांना खोट्या प्रकरणांत अडकवून त्यांना गप्पा करण्याचं काम सरकारद्वारे सुरु आहे.
ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगातील वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवावर आधारित लिहीलेल्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संजय राऊत त्यांनी आपले मनोगत व्यक्त ( Sanjay Raut On ED ) केले. ते म्हणाले, मी पुस्तकात जे लिहीले आहे ते सत्य आहे. त्यामध्ये कोणतेही रडगाणे नाही. माझ्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, 'आप'चे संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात होतो. आम्ही कारवाईला सामोरे गेलो, पण जुलमी शासन व्यवस्थेच्या या साम्राज्यासमोर आम्ही झुकलो नाही. तुरुंगात गेल्यानंतर जगाशी सर्व संबंध तुटतात. तेव्हा तुरुंगातील दगडाच्या भिंती पाहून सकारात्मक विचार ( Sanjay Raut On ED ) करून दिवस काढले, असेही राऊत यावेळी म्हणाले.
मोठ्या उंदराची गोष्ट
तुरुंगातील अनुभव सांगताना राऊत पुढे म्हणाले, एके दिवशी तुरुंगात मोठा ससा दिसला. तेव्हा कोणीतरी म्हणाले की तो ससा नसून सफेद उंदीर आहे. तुरुंगात आम्हाला खायला मिळत नाही आणि एवढा मोठा उंदीर पाहून आश्चर्य वाटले. त्या उंदीराला अनिल देशमुख यांनी नाव ठेवले होते. त्यांचे नाव घेणे योग्य नाही, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे राऊत यांनी म्हणताच ( Sanjay Raut On ED ) सभागृहात हास्यस्फोट झाला.
ईडीच्या कारवाईची खिल्ली
मी शेवटचा माणूस होतो की ज्याच्याशी ईडीने पंगा घेतला. त्यामुळे ईडी यापुढे आपल्या दारात येणार नाही. कारण, मी त्यांचा बुच मारून ठेवलाय, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईची खिल्ली उडवली आहे. ज्यांनी आम्हाला पकडले त्यांना आता पश्चाताप होत आहे, असा टोलाही त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. यानंतर ते पुढे म्हणाले, पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब ज्या कोठडीत होता त्या कोठडीत मी होतो. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी विचारले की कोठडीत कसे वाटले. कारण ती कोठडी पाटील यांनी तत्कालीन गृहमंत्री असताना बनवली होती, असे सांगताच सभागृहात हास्स्यकल्लोळ झाला.