दिल्ली : ( AAP BJP Merger ) राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपात हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांना करत आहेत. तर, यात आणखीनच भर म्हणजे, काँग्रेस पक्ष सुद्धा या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात आपले नाक खुपसत आहे. काँग्रेसने एक नवीन दावा करून राजकीय वादळ निर्माण केले आहे. दिल्ली महापालिकेतील आप नगरसेवकांच्या राजीनाम्यावरून तसेच इंद्रप्रस्थ विकास पक्षाच्या स्थापनेच्या घोषणेवरून काँग्रेसने 'आप'वर तीव्र हल्ला चढवला ( AAP BJP Merger ) आहे.
आताच दिल्ली येथील महानगरपालिकेतील आम आदमी पार्टीच्या 15 नगरसेवकांनी एकत्रितपणे राजीनामा दिला होता. यासोबतच त्यांनी इंद्रप्रस्थ विकास पक्षाच्या स्थापनेची घोषणाही केली. राजकीय विश्लेषक आप नेत्यांच्या या निर्णयाला अरविंद केजरीवालांसाठी धक्का मानत आहेत. तर, दुसरीकडे निवडणुकीनंतर दिल्लीत केजरीवाल यांच्या निष्क्रियतेबद्दलही चर्चा होत आहेत. यातच काँग्रेसने एक नवीन दावा ( AAP BJP Merger ) केला.
उदित राज यांचा दावा
काँग्रेस नेते आणि माजी भाजपा खासदार उदित राज म्हणाले की, जर भाजपा आम आदमी पार्टीच्या नेत्यांना स्वीकारण्यास तयार असेल, तर काही अपवाद वगळता बहुतेक एमसीडी नगरसेवक भाजपामध्ये सामील होण्यास तयार आहेत. उदित राज यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून म्हटले की, 'आप'कडे कोणताही ठोस वैचारिक पाया नाही. हेच कारण आहे की आम आदमी पार्टीचे नेते सतत संघटना सोडत आहेत.
काँग्रेस नेते इथेच थांबले नाहीत. आम आदमी पार्टीवर गंभीर आर्थिक आरोप करत ते म्हणाले की, दिल्लीत सत्तेत असताना आप नेत्यांनी येथून पैसे लुटले आणि ते गुजरात, पंजाब आणि गोवा सारख्या राज्यांच्या निवडणुकीत खर्च केले. उदित राज म्हणाले, 'आप' हा पैसा लुटणारा पक्ष आहे. जे करांमधून गोळा होणाऱ्या पैशातून दिल्लीतील लोकांना वीज आणि पाणी यासारख्या सुविधा देऊन लोकप्रियता मिळवतो.