Blindness Causing Blackfly : ब्लॅकफ्लायचा धोका ! डोळ्यांचा जीव घेणारी काळी माशी

02 May 2025 19:51:44

black
दिल्ली : ( Blindness Causing Blackfly ) झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (झेडएसआय) रक्तशोषक काळ्या माश्यांबाबत (ब्लॅकफाय) महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. या ‘काळ्या’ माश्या उत्तर बंगालच्या अनेक भागांत आढळतात. काळ्या माश्या ( Blindness Causing Blackfly ) मानवांमध्ये अंधत्व निर्माण करणाऱ्या जंतूंच्या वाहक असतात. म्हणजेच या माश्या चावल्या आपल्याला अंधत्व येऊ शकते. विशेषतः पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग आणि कालिम्पोंग जिल्ह्याच्या नदीकाठच्या परिसरात या आढळतात. त्यांना स्थानिक भाषेत ‘पिप्सा’ किंवा ‘पोटू’ माश्या म्हणून ओळखले जाते.
 
दार्जिलिंग आणि कालिम्पोंगमध्ये वर्षभर पर्यटक येत असतात. आता यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दार्जिलिंग असो किंवा कालिम्पोंग, दोन्ही ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे आहेत. दोन्ही पर्यटनस्थळे सामाजिक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. लोक वर्षभर या ठिकाणी भेट देतात. पर्यटनाचा आनंद घेताना नकळत या रक्तशोषक माश्या चावू शकतात. स्थानिक लोकांना या माश्यांचा जास्त धोका आहे. त्यांच्या रोजच्या सहवासात या माश्या येत असतात.
 
विशेष म्हणजे अंधत्वाचा धोका हाच मुख्य चिंतेचा विषय आहे, असे झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संचालक डॉ. धृती बॅनर्जी यांनी सांगितले. ब्लॅक फ्लाईजमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अलीकडच्या काळात या माश्यांमुळे या प्रांतातील कुणालाही रिव्हर ब्लाईंडनेस आजाराची लागण झालेली नाही, असे संशोधकांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0