Pakistani Citizenship Audit : पाकिस्तानी नागरिकांचे ऑडिट ! येथे आढळले केवळ 13 पाकिस्तानी मुस्लिम

02 May 2025 21:19:07
 
pakista
 
नागपूर : ( Pakistani Citizenship Audit ) राज्य गुप्तचर खात्याने (एसआयडी ) महाराष्ट्रात राहात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा आढावा घेतला. व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून एसआयडीचे आयुक्त शिरीष जैन यांनी राज्याचे सर्व पोलिस आयुक्त आणि अधिक्षकांसोबत बैठक घेतली. यात प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या आदेशांचे पालन करणे आणि व्हीसा कालावधीच्या अधिक दिवसांपर्यंत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाची ( Pakistani Citizenship Audit ) ओळख पटवून त्यांना निर्वासित करण्यास सांगितले.
 
दरम्यान माहितीनुसार, सध्या जवळपास 2,400 पाकिस्तानी नागरिक नागपुरात राहतात. त्यापैकी अनेक उपचारासाठी अल्पकालीन किंवा दीर्घकालीन व्हीसावर भारतात आले आहेत. बहुतांश जरीपटका, मोमिनपुरा, जाफरनगर आणि उत्तर नागपूरच्या इतर भागात वास्तव्यास असून नातेवाईकांकडे राहात आहेत. जवळपास 1,000 दीर्घकालीन व्हीसा (एलटीव्ही) वर आहेत, तर इतरांकडे अल्पकालीन किंवा वार्षिक व्हीसा आहे. आश्चर्यकारक म्हणजे नागपुरात केवळ 13 पाकिस्तानी नागरिक मुसलमान ( Pakistani Citizenship Audit ) आहेत. इतर सर्व हिंदू किंवा दुसऱ्या धर्माचे आहेत. अनेकजण पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून आहेत आणि आणि फाळणीपूर्वीच्या कौटुंबिक संबंधांचे कारण देऊन भारतीय नागरिकत्व मागत आहेत.
 
मोठ्या संख्येत चार दशकांपासून भारतात राहात असलेले पाकिस्तानी नागरिक आता बेपत्ता ( Pakistani Citizenship Audit ) आहेत. काहींचा वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला आहे तर काहींनी आपले राहण्याचे ठिकाण बदलले आहे. बैठकीत जैन यांनी सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षकांना पाकिस्तानी नागरिकांशी संबंधित डाटाचे योग्य संकलन करणे, पुन्हा त्याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. त्यांनी अल्पकालीन व्हीसा घेऊन येणाऱ्यांची एक यादी तयार करण्यास सांगितले. सोबतच त्यांना देश सोडण्यासाठी सांगितले अथवा नाही हे सुनिश्चित करण्याचेही निर्देश दिले. केंद्राच्या कठोर भूमिकेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
 
1500 हून अधिक लोकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही केला आहे. केंद्राकडून मिळालेल्या निर्देशानंतर राज्य शासनानेही स्पष्ट सांगितले आहे की, राज्यात कोणताही पाकिस्तानी नागरिक राहायला नको. वैद्यकीय व्हीसावर राहणाऱ्यांना 29 एप्रिलपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. नागपुरातील सर्व पाकिस्तानी नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शहर पोलिस दिवस-रात्र काम करीत आहेत. स्थानिक पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0