नवी दिल्ली : ( SYL Water Dispute ) हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हरियाणाला अधिक पाणी देण्यास नकार दिल्यानंतर, सैनी यांनी म्हटले की भगवंत मान या विषयाचं राजकारण करत असून, हरियाणावर अन्याय करत आहेत. सैनी यांनी स्पष्ट केलं की सतलज-यमुना लिंक (एसवायएल) कालव्याचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र हा वाद केवळ एसवायएलचा नाही, तर पिण्याच्या पाण्याचा आहे. सैनी यांच्या म्हणण्यानुसार, मागील आठवड्यात हरियाणाला केवळ ४,००० क्युसेक पाणी मिळालं, जे राज्याच्या गरजेपेक्षा फक्त ६० टक्के आहे. त्यांनी बीबीएमबी कडून उर्वरित पाणी मिळाल्यास ते भाकरा धरणाच्या साठ्यात फारच क्षुल्लक फक्त ०.०००१ % असेल, असंही नमूद केलं. तसेच, सैनी यांनी भगवंत मान ( SYL Water Dispute ) यांच्यावर दिल्लीतील पराभवाचा राग हरियाणावर काढत असल्याचा आरोप करत म्हटलं की, दिल्लीतील अपयशामुळे ते हरियाणाच्या जनतेला "शिक्षा" देत आहेत.
हरियाणा आणि दिल्लीला पाणीपुरवठा थांबवून पंजाब घाणेरडे राजकारण करत असल्याचा दावा दिल्लीचे मंत्री परवेश साहिब सिंग यांनी X वर केला आहे. पंजाबने राजकीयदृष्ट्या हे पाऊल आहे. दिल्लीत पराभव झाल्यानंतर राज्यात पाणी संकट निर्माण ( SYL Water Dispute ) करण्याचा पंजाब सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले आहेत. दिल्ली सरकार प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचावे यासाठी सतत प्रयत्न करत आहे. परंतु, पंजाब सरकार दिल्लीतील रहिवाशांचा "बदला" घेण्याचा प्रयत्न करते आहे.
राजधानी दिल्ली आधीच वाढत्या तापमानासोबत पाण्याच्या गंभीर समस्येची झुंज देत आहे. दिल्लीला होणारा पाणीपुरवठा रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचे परवेश सिंग म्हणाले आहेत. आम्ही दिल्लीतील प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी दिवसरात्र काम करत आहोत. आता पंजाब सरकार अशा प्रकारे दिल्लीतील लोकांवर सूड घेऊ इच्छित आहे. हे घाणेरडे राजकारण थांबवा, नाहीतर तुम्हाला पंजाबमधूनही हाकलून लावले जाईल अशा इशाराही त्यांनी दिला.