
अमृतसर : ( Foiled Attack On Golden Temple ) भारतीय सैन्याने पाकिस्तानचा आणखी एक नापाक कट उधळून लावला आहे. पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि नवीनतम तंत्रज्ञानामुळे ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. पाकिस्तानने डागलेले क्षेपणास्त्र आणि पाठवलेले ड्रोन हवाई संरक्षण यंत्रणेने वेळीच पाडल्याचे त्यांचा हल्ला निष्फळ ठरला, असे भारतीय लष्कराने सांगितले आहे.
भारतीय सैन्याने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे अवशेषही माध्यमांना दाखवले आहेत. लष्कराने आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि एल 70 हवाई संरक्षण तोफांनी जलद प्रतिसाद दिला. तसेच सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील इतर शहरे कशी सुरक्षित ठेवली हे दाखवणारा एक प्रात्यक्षिक सुद्धा सादर केला. या प्रात्यक्षिकातून असेही सांगण्यात आले की जर सुरक्षा दल सतर्क नसते तर मोठे नुकसान होऊ शकले असते. पाकिस्तानने भारतातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आजवर अनेकदा केला ( Foiled Attack On Golden Temple ) आहे. पण यावेळी त्याचा हेतू स्पष्ट होता. त्यांना देशाच्या श्रद्धेला आणि अखंडतेला खंडित करायचे होते. सुदैवाने, भारतीय सैन्याच्या दक्षतेमुळे आणि तांत्रिक ताकदीमुळे एक मोठा धोका टळला.