Ceremonial Standoff : बिटींग रिट्रीट सेरेमनी प्रारंभ, पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...

21 May 2025 15:55:49


beating

दिल्ली - ( Ceremonial Standoff ) पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर दररोज होणारी बिटींग रिट्रीट सेरेमनी स्थगित करण्यात आली होती. ती पुन्हा बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे. पाकिस्तान सीमेवरील पंजाबमध्ये येणाऱ्या तीन ठिकाणी हा सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ बुधवारपासून सुरू केला जाणार असल्याचे बीएसएफने म्हटले आहे. मंगळवारी होणारी बिटींग रिट्रीट सेरेमनी फक्त प्रसारमाध्यमांसाठी खुली होती. बुधवारपासून सामान्य नागरिक ते पाहण्यासाठी येऊ शकतात, असे जालंधर येथील मुख्यालय असलेल्या पंजाब फ्रंटियरने सांगितले आहे. या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 6 वाजता असणार आहे. अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे हा कार्यक्रम होणार आहे. असे असले तरी काही गोष्टी या पाळल्या जाणार आहेत. पाकिस्तानसोबत आताही तणाव आहे. यामुळे नेहमीप्रमाणे ध्वजारोहण प्रक्रियेदरम्यान गेट उघडले जाणार नाहीत, तसेच भारताचे जवान पाकिस्तानी रेंजर्सशी हस्तांदोलन करणार नाहीत ( Ceremonial Standoff ), असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीएसएफ जवानांकडून दररोज ध्वज उतरवला जात ( Ceremonial Standoff ) होता. लोकांच्या सुरक्षिततेचे कारण देत बीएसएफने 8 मे रोजी या तीन ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रवेश बंद केला होता. ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेण्यात आला होता. भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. आता जवळपास 13 दिवसांनी या तीन ठिकाणी बिटींग रिट्रीट सेरेमनी होणार आहे. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने चार दिवस भारतावर हल्ले केले होते, परंतू भारताने सर्व हल्ले परतवून लावले होते. तसेच प्रत्त्यूत्तरात भारताने पाकिस्तानचे 11 एअरबेसना नुकसान पोहोचविले होते. यामुळे पाकिस्तान भारताला शरण आला होता. सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धविराम करण्यात आला ( Ceremonial Standoff ) आहे.

पूंछमध्ये सापडला जिवंत पाकिस्तानी बॉम्ब

सुरक्षा दलांना मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथील एका गावातून एक जिवंत पाकिस्तानी बॉम्ब सापडला, जो नंतर सुरक्षा दलांनी निकामी केला. ते जम्मू आणि काश्मीरच्या एका सीमावर्ती गावाजवळ आढळले. स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेसाठी, जिवंत बॉम्ब रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला आणि नंतर तो निकामी करण्यात आला. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, पाकिस्तानने डागलेले जिवंत बॉम्ब सैन्य नष्ट करत होते. दारा बाग्यालमधील जिवंत बॉम्ब येथे राहणाऱ्या सर्व लोकांसाठी धोका होता. आता धोका टळला आहे. संपूर्ण पूंछमध्ये सैन्य प्रचंड काम करत आहे. जिवंत बॉम्ब रस्त्याच्या कडेला होता आणि जवळच एक वस्ती होती. तथापि, लष्कराच्या जवानांनी ते उद्ध्वस्त केले.
Powered By Sangraha 9.0