Rohit Pawar Attack : अजित पवारांचा वचक कमी पडतोय ? असं का म्हणाले रोहित पवार

21 May 2025 17:20:45
 
rihi
 
सातारा - ( Rohit Pawar Attack ) बीडमध्ये आजही मारहाणीचे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचा वचक तिथे कमी पडल्याचे दिसत आहे, असे म्हणत बीडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
 
बीडमध्ये नुकताच एका तरुणाला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार ( Rohit Pawar Attack ) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते मंगळवारी सकाळी येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, बीडमध्ये आजही मारहाण करण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. तिथे पोलिस प्रशासनाचा वचक बऱ्यापैकी बसला आहे. पण पालकमंत्री अजित पवार यांचा वचक कमी पडत आहे. तिन्ही सैन्यदलांमुळे देश सुरक्षित आहे. त्यामुळे तिरंगा रॅली काढून कुणी राजकीय स्टंट करत असेल तर त्यातून काय साध्य होईल हे माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची केवळ चर्चा आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही.
Powered By Sangraha 9.0