Goat Gold Scam : सांगलीत दोन शेळ्यांनी केला ‘गोल्ड स्कॅम’ ! अखेर उघड झालं धक्कादायक गुपित

22 May 2025 12:40:14

goat
 
सांगली : ( Goat Gold Scam ) मिरज तालुक्यातील सोनी गावात एक धक्क्कादायक प्रकार घडला आहे. मिरज येथील जिल्हा पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय डोके यांनी गाढवे यांना दोन्ही शेळ्या घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयामध्ये येण्यास सांगितले. यावेळी दोन्ही शेळ्यांची तपासणी करून त्यांच्या पोटाचे एक्स-रे काढण्यात आले. या एक्स-रे मध्ये धातूसदृश्य वस्तू त्यांना आढळून आली. त्यानंतर दोन्ही शेळ्यांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया ( Goat Gold Scam ) करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पोटात असणारे प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बाहेर काढण्यात आले. आणि प्रकाश गाढवे यांना सुपूर्द करण्यात आले.
 
असे गिळले शेळ्यांची कर्ण वेल
 
दोन शेळ्यांनी सोन्याचे कर्ण वेल गिळल्याची घटना घडली आहे. प्रकार लक्षात येताच शेळीमालक प्रकाश गाढवे यांनी मिरजेच्या शासकीय पशू रुग्णालयात धाव घेतली. शस्त्रक्रियेनंतर शेळ्यांच्या पोटातून 40 हजार रुपये किमतीचे दागिने काढण्यात आले आहेत. सोनी या ठिकाणी प्रकाश गाढवे हे शेतकरी कुटुंब राहते. उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी शेळ्या देखील पाळल्या आहेत. प्रकाश गाढवे यांच्या एका मुलीने तिचे कानातले धुण्यासाठी एका ताटात काढून ठेवले होते. त्यात पाणी देखील होतं. नेमकं याचवेळी तिथे आलेल्या त्यांच्या दोन शेळ्यांनी ताटातलं पाणी पिण्यास सुरुवात केली. दोन्ही शेळ्यांनी दोन-दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णवेल पाण्यासह गिळले.
 
 
Powered By Sangraha 9.0