Forest Department : महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच घोटाळ्याचा अड्डा ! 75 गायब फायलींचा थरार उघड

23 May 2025 16:52:19

fore
 
नागपूर : ( Forest Department ) वन हक्क पट्टे वाटपाशी संबंधित 75 वर फाईल गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती जिल्हाभर असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार होत असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
जिल्ह्यात वन हक्क पट्टे वाटपाला गेल्या दशक, दीड दशकात गती आल्याचे सांगितले जात आहे. वन हक्क पट्टे ( Forest Department ) अंतर्गत शहर व तालुक्याच्या लगतच्या भागातील जमीन प्राधान्याने वाटप करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यातील काही जागा अतिशय मोक्याच्या ठिकाणच्या आहेत. तर, कामठी, हिंगणा, उमरेड, सावनेर, कळमेश्वरसह आणखी काही तालुक्यातील प्रमुख मार्गावरील जमीन देण्यात आली. अतिक्रमण नसतानाही फक्त दंड आकारून त्याआधारे अर्ज करून जागा घेण्यात आली. काही प्रकरणात तर ग्रामपंचायतचा ठरावही नसल्याचे सांगण्यात येते. डोंगरगाव येथील नियमबाह्य पट्टे वाटप प्रकरणानंतर हा घोळ समोर येत आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यातील सात फाईल गायब आहेत.
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायब सूत्राकडून फाईलचा आकडा ( Forest Department ) हा जवळपास 75 ते 100 आहे. स्कॅनिंगसाठी फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आल्या. परंतु, आता फाईलच दिसत नाही आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणाहून मुख्यालयाकडे बोट दाखविण्यात येत आहे. तर मुख्यालयातही या फाईल नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमक्या फाईल गेल्या कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर कुणीही फारसे बोलण्यास तयार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात फाईल गायब असताना त्या शोधण्यासाठी कोणतीच ठोस पावले उचलण्यात येत नसल्याने शंका निर्माण होत आहे. त्यामुळे काहींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा प्रशासनात आहे.
 
Powered By Sangraha 9.0