दिल्ली : ( PM Modi On Pak ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 103 रेल्वे स्थानकांचे पुनर्बाधणी नंतर उद्घाटन केले. या सर्व स्थानकांना अमृत भारत स्थानक असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 103 तर महाराष्ट्रातील 15 स्थानकांचे उद्घाटन केले, ज्यामध्ये मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील वडाळा, चिंचपोकळी, माटुंगा, परळ आणि शहाड स्थानके तर विदर्भातील मूर्तिजापूर, इतवारी, आमगाव, चांदाफोर्ट या स्थानकांचा समावेश आहे. देशात 1300 हून अधिक स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. यापैकी 100 हून अधिक अमृत भारत स्टेशन पूर्ण झाले आहेत आणि सुमारे 26,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आज होत आहे. देशातील रेल्वे आणि स्थानकांच्या आधुनिकीकरणाचा ( PM Modi On Pak ) खर्च गेल्या दशकात झालेल्या खचपिक्षा 6 पट जास्त आहे.
यामध्ये नाशिक, महाराष्ट्रातील 'देवलाली' सह 15 स्थानकांचा समावेश आहे. या योजनेचा उद्देश भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधा जागतिक मानकांच्या ( PM Modi On Pak ) बरोबरीने आणणे आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करणे आहे. ही 103 स्थानके अंदाजे 1100 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आली आहेत. ही स्टेशन्स देशातील 86 जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहेत. यात आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पुडुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. ही स्थानके प्रवाशांच्या सुविधांच्या बाबतीतच अपग्रेड करण्यात अली असून यात प्रादेशिक संस्कृती, स्थानिक वास्तुकला आणि पर्यावरणीय मानके लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहेत.
असा साधला पाकिस्तानवर निशाणा
या स्थानकांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी ( PM Modi On Pak ) त्यांच्या भाषणात ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करून पाकिस्तानला कडक इशाराही दिला, ते म्हणाले की जेव्हा सिंदूर बारूदमध्ये बदलतो तेव्हा काय होते ते जगाने पाहिले आहे. जेव्हा दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये गोळीबार केला तेव्हा त्यांनी 140 कोटी भारतीयांच्या हृदयाला छेद दिला. त्यावेळी देशाने एक प्रतिज्ञा घेतली होती. आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा करू. त्याला कल्पनेपलीकडे शिक्षा दिली जाईल. जे देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या आणि जनतेच्या संतापामुळे आश्वासनापासून निकालात रूपांतरित झाले. पंतप्रधान म्हणाले की जे लोक सिंदूर पुसण्यासाठी बाहेर पडले होते. भारताने त्यांना जमिनीवर पाडले. ज्यांनी भारताचे रक्त सांडण्याचे काम केले त्यांना त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब दिला आहे.
पंतप्रधान ( PM Modi On Pak ) म्हणाले की, हा केवळ सूड नाही. हे भारताचे भयंकर असे नवे रूप आहे. हा भारताचा नवा चेहरा आहे. ज्याने यापूर्वी दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानात घुसून हल्ला केला होता. यावेळी त्याच्या छातीवर हल्ला झाला. पाकिस्तान आमच्या एकाही लष्करी तळाला हानी पोहोचवू शकला नाही. तर आम्ही त्यांच रहिमयार खान हवाई तळ उद्धवस्त केले आहे. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा अभिमान होता. आज तो त्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. ते पुढे म्हणाले की भारताने स्पष्ट केले आहे की दहशतवादी कारवाया यापुढे सहन केल्या जाणार नाहीत. पाकिस्तानने कधीही भारताविरुद्ध थेट युद्ध जिंकलेले नाही. ज्यामुळे तो अनेक दशकांपासून भारतात दहशतवाद पसरवत आहे.