Savarkar Spotlight : इतिहास नव्याने उघडणार ! वीर सावरकरांचं गाव पुन्हा केंद्रस्थानी

23 May 2025 19:13:14

savarkar 
सरकारला वीर सावरकरांच्या ( Savarkar Spotlight ) गावाला पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान द्यायचे आहे. लोक स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांच्या गावांना भेट देण्याचा विचार करतील तेव्हा त्यांनी भगूरला येण्याचे नियोजन करावे, हा यामागचा हेतू आहे. यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी ही नानिज रेल्वेस्थानक ते भगूर प्रवास व्यवस्था सुधारण्याचा सल्लाही दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे ( Savarkar Spotlight ) जन्मगाव भगूरला राष्ट्रीय पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान देण्याची तयारी सुरू केली आहे.
 
या योजनेअंतर्गत पहिले पाऊल म्हणजे देवळाली रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करून त्याची पुनर्बांधणी करणे. स्टेशनवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वेचे हे स्थानक वीर सावरकरांचे ( Savarkar Spotlight ) मूळ गाव भगूरपासून फक्त 3 कि.मीवर आहे. रेल्वे प्रशासन देवळाली स्थानकावर आणखी गाड्या थांबविण्याच्या योजनेवर विचार करत आहे. जेणेकरून नाशिकला येणारे पर्यटक व इतर प्रवासी एक स्टेशन आधी देवळाली स्थानकावर उतरू शकतील आणि सावरकरांचे गाव पाहू शकतील.
 
प्रथम स्वातंत्र्य सेनानी
मोदी सरकार कडून सावरकरांना भाजपाच्या केंद्रीय राजकारणाच्या मुख्य मुद्द्यांमध्ये नेहमीच समाविष्ट केले आहे. भाजपा आणि रा. स्व. संघदेखील सावरकरांना भारताचे पहिले स्वातंत्र्य पुरुष म्हणतात. भाजपाने आपल्या मित्र पक्षांना स्पष्टच केले की, जर त्यांना रालोआ आघाडीत राहायचे असेल, तर सावरकर हे भाजपाचे प्रतीक आहेत हे त्यांना मान्य करावे लागेल.
गॅलरीही उभारणार
महाराष्ट्र सरकारनेही या दिशेने काही पावले उचलली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृत्यर्थ गॅलरी उभारण्याचेही नियोजन आहे.
Powered By Sangraha 9.0