Shani Remedy : शनीची कृपा की विनाश ? 'हे' झाड ठरवेल तुमचं नशिब !

Top Trending News    23-May-2025
Total Views |

shami 1
 
आपल्या शास्त्रानुसार, शमीचे रोप घरात लावणे शुभ ( Shani Remedy ) असते. शमीचे रोप विजय आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अशी मान्यता आहे की, शमी शनिदेवाची वनस्पती आहे. शिवाय शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शमीच्या रोपाची नियमित पूजा करणे फायद्याचे मानले जाते. आपण शमीच्या रोपाचे धार्मिक महत्त्व आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
 
पौराणिक कथा
 
शमीचा झाडाचा ( Shani Remedy ) संबंध भारतीय पौराणिक कथा आणि परंपरेशी जोडलेला आहे. या कथांनुसार असे मानले जाते की, रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान रामाने शमीच्या पानांचा वापर करून भगवान शिवाची पूजा केली होती. त्यामुळे, आजही दसऱ्याच्या सणात शमीच्या रोपाची पूजा केली जाते.
 
वास्तुशास्त्र काय सांगते ?
 
वास्तुशास्त्राच्या मते, जर कुंडलीतील शनिदोष किंवा शनीचा प्रभाव ( Shani Remedy ) असेल तर तुम्ही शमीचे रोप घरात लावायला हवे. असे केल्याने कुंडलीतील शनिदोष दूर होतो.
 
शमीचे रोप लावण्याचे फायदे
 
१) शमीचे रोप जमिनीत लावणार असाल तर घराबाहेर किमान 5 ते 6 फूट अंतरावर लावणे फायद्याचे ठरेल. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला शमीचे रोप लावणे शुभ परिणाम देणारे ठरते.
 
२) घराच्या प्रवेशद्वारावर शमीचे रोप लावत नसाल तर घराच्या टेरेसेवर किंवा बाल्कनीत लावू शकता. शनीची साडेसाती सुरू असल्यास घरी शमीचं रोप लावावे.
 
३) शमीच्या रोपामुळे कुंडलीतील ग्रह-नक्षत्रांची स्थिती मजबूत होते आणि साडेसाती कमी होते. शमीची नियमित पूजा केल्यास शनिदेवाची कृपा सदैव राहते असे म्हणतात.
 
४) शमीचे रोप शनिवारी लावणे शुभ असते. शनिवारी शमीची रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते. अडी-अडचणी दूर होतात. तसेच कुटूंबातील सदस्यांची प्रगती होते.