मुंबई : ( Unexpected Monsoon ) भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात पोहोचला असून पुढील तीन दिवसांत तो मुंबई आणि इतर काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सून नेहमीपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी मान्सून केरळात पोहोचला आता त्याला महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून रविवारी महाराष्ट्रात दाखल ( Unexpected Monsoon ) झाला.
मुसळधार पावसाचा इशारा
अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त ( Unexpected Monsoon ) केला आहे.
महाराष्ट्रातील कोकण किनारी भाग आणि मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. 2009 नंतर पहिल्यांदाच मान्सूनचे केरळमध्ये इतक्या लवकर आगमन झाले आहे. नैऋत्य मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये येतो आणि त्यानंतर 8 जुलै रोजी संपूर्ण देशात पोहोचतो. मान्सून 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो. 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो. पुढील तीन दिवसांत मान्सून कर्नाटकात, बंगळुरूसह, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतेक भाग आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात पोहोचण्याची ( Unexpected Monsoon ) अपेक्षा आहे.
आयएमडीने सांगितल्यानुसार, रविवारी मान्सून अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटक, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर बंगालच्या उपसागरात आणि मिझोरम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पोहोचला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनची उत्तरेकडील सीमा देवगड, बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, ऐझवाल, कोहिमा येथून जाते. मध्य अरबी समुद्राच्या काही भागात आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या काही इतर भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे ( Unexpected Monsoon ) आयएमडीने म्हटले आहे.