पुणे : ( Ajit Pawar ) पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. बारामती, दौंड, जुन्नर, खेड, शिरूर, भोर, मुळशी, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर, हवेली तालुक्यात पावसाने परिस्थिती चांगलीच वाईट आहे. अवघ्या एका दिवसात तब्बल 13 इंच पाऊस पडल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या भागांची वार्षिक सरासरी पावसाची मर्यादा 14 इंच आहे, त्यामुळे एका दिवसात इतका पाऊस पडणे हे अतिशय धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. असं असताना आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर ( Ajit Pawar ) यांनी भल्या पहाटे पुणे, इंदापूर, बारामती दौरा केला. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये अवकाळी मुसळधार पावसाने मोठा कहर केला आहे.
असे म्हणाल्या अजित पवारांच्या आई
अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, माझी आई 87 वर्षाची आहे. आईचे लग्न झाले त्याला 51 वर्ष झाली. तेव्हापासून एवढा पाऊस आईनेही पाहिला नाही. बारामती दौंड इंदापूरची वार्षिक सरासरी 14 इंच आहे. 13 इंच पाऊस एका दिवसात पडला. काही ठिकाणी सात सात इंच पाऊस पडला, असेही पवार ( Ajit Pawar ) यांनी सांगितले. नीरा डावा कालवा आणि आणखी एका कालव्याला भगदाड पडल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, सोनगाव, ढेकळवाडी, इंदापूर परिसरात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सात सात इंच पाऊस झाल्याचेही नोंदले गेले आहे. शेतकऱ्यांची पिके, जनावरांचा चारा आणि नागरिकांची घरं या सर्वांचे मोठे नुकसान झाल्याचे पवार ( Ajit Pawar ) यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे
अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, एनडीआरएफच्या दोन टीम मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. नुकसानग्रस्तांना तत्काळ स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.