Forensic Science Revolution : शोध सत्याचा, पाया शाहांचा ! ट्रांजिस्ट कॅम्पसच्या अनावरणामागचे रहस्य

27 May 2025 10:23:30

amit
 
नागपूर : ( Forensic Science Revolution ) राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या (एनएफएसयू) स्थायी कॅम्पसचे आणि एनएफएसयूच्या तात्पुरत्या कॅम्पसचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. हे कामठी तालुक्यात चिचोली येथे उभारण्यात आले आहे. गृहमंत्री शाह यांच्या हस्ते विटा रचून पायाभरणी करण्यात आली. तसेच, या परिसरात ट्रांजिस्ट कॅम्पसचे ई- अनावरणसुद्धा करण्यात आले. नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (एनएफएसयू) ही जगातील पहिली आणि एकमेव फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंह चहल, एनएफएसयूचे कुलगुरू डॉ. जे. एम. व्यास, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आदी ( Forensic Science Revolution ) उपस्थित होते.
 
महाराष्ट्रात एनएफएसयूच्या नवीन कॅम्पसच्या स्थापनेमुळे 'कुशल फॉरेन्सिक तज्ज्ञांचा' समूह तयार होईल. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना फॉरेन्सिक सायन्सच्या वैज्ञानिक वापराद्वारे गुन्हे रोखण्यास, कमी करण्यास आणि शोधण्यास मदत मिळेल. तसेच, सर्व भागधारकांच्या फॉरेन्सिक क्षमता वाढवेल. तसेच, या कॅम्पसमुळे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित विविध समस्या सोडवण्यास मदत होईल. ज्यामुळे न्यायदान प्रणाली वेगवान होईल. न्यायव्यवस्थेला या कॅम्पसद्वारे बळकटीकरण मिळणार आहे. त्यामुळे या अनावरणाला अनन्य साधारण महत्व ( Forensic Science Revolution ) दिले आहे.
 
नागपूर कॅम्पस हे एनएफएसयूचे ११ वे कॅम्पस असेल. गुजरात, नवी दिल्ली, गोवा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, मणिपूर, पुणे आणि परदेशात युगांडामध्ये येथे सदर विद्यापीठ कार्यरत आहे. तसेच, राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नागपूर कॅम्पसमध्ये न्यायवैद्यक विज्ञान आणि सायबर सुरक्षेशी संबंधित पाच अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0