Pakistani Link Controversy : गोगोईंच्या पत्नीला पाकिस्तानकडून पगार ! आसाम मुख्यमंत्र्यांचा स्फोटक आरोप

27 May 2025 19:38:48

pakistan 
 
दिल्ली : ( Pakistani Link Controversy ) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या परदेशी पत्नी आरोप केलं आहे. गोगोई यांच्या परदेशी पत्नी एलिझाबेथ कोलबर्नच्या पाकिस्तानी कनेक्शनवर प्रश्न उपस्थित केला आहे. देशाच्या मुख्य विरोधी पक्षाच्या उपसभापतींच्या पत्नी आणि शत्रू देश यांच्यातील असे थेट संबंध देशाच्या एकतेसाठी आणि सुरक्षेसाठी मोठा धोका आहेत. आम्हाला या धक्कादायक वस्तुस्थितीची आधी कल्पना नव्हती. आता हे प्रकरण उघडकीस आले आहे, त्यामुळे त्यांची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करता येणार नाही. आम्ही बोरा यांचे जबाब नोंदवू आणि पुढील कारवाई करू.
 
त्यांनी एक्सवर ट्विट केले आहे, ज्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते रिपुन बोरा यांचा हवाला दिला आहे की, खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी पाकिस्तान सरकारकडून पगार घेत होत्या. हिमंता यांनी पोस्टमध्ये लिहिले - काल काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते रिपुन बोरा यांनी एक धक्कादायक खुलासा केला. बोरा यांनी कबूल केले की, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची ब्रिटिश पत्नी पाकिस्तान सरकारच्या पगारावर होती. जर हे खरे असेल तर ते देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर प्रश्न ( Pakistani Link Controversy ) उपस्थित होतो आहे.
 
गोगोई यांनी फेटाळले सर्व दावे
 
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर, काँग्रेस खासदाराने एक्सवर चार पोस्ट केल्या. यामध्ये त्यांनी लिहिले, मुख्यमंत्री ज्या स्क्रिप्टवर काम करत आहेत ती बी ग्रेड चित्रपटापेक्षाही वाईट आहे. एक खोटे लपवण्यासाठी माणसाला असंख्य खोटे बोलावे लागते. मुख्यमंत्री नेमके हेच करत आहेत. ते कोणतेही तथ्य देत नाहीत आणि फक्त आयटी सेलच्या ट्रोलसारखे ( Pakistani Link Controversy ) वागत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0