CM Fadanvis : अनुदानित शाळा बंद करण्यामागे कोण ? मुख्यमंत्र्यांचा निर्णय ठरणार निर्णायक

29 May 2025 22:11:35

ganar
 
नागपूर : ( CM Fadanvis ) शिक्षण व्यवस्थेला हादरवणारा आरोप आमदार गाणार यांच्या कडून करण्यात आला आहे. अनुदानित शाळा बंद करण्याच्या विरोधात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आरटीई कायद्याअंतर्गत सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. तर, दुसरीकडे शाळांमधील शिक्षकांची संख्या कमी करून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे अध्यापन निर्धाराचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे.
 
स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही राज्यातील 8213 गावात अजूनही प्राथमिक शाळा नाहीत. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक सत्र 2024-15 अध्यापन निर्धार धोरणानुसार, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शून्य शिक्षक पदे मंजूर आहेत. या परिस्थितीत कमी विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री ( CM Fadanvis ) आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून गाणार यांनी तक्रार केली आहे. ते तक्ररीत म्हणाले, कर्मचारी मान्यतेच्या सुधारित निर्णयाद्वारे सरकार अनुदानित, अंशतः अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. याचा परिणाम असा होईल की गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर नेले जाईल आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग खुंटेल.
 
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा भरती नियम 1981 मधील अनुसूची 'अ' नुसार, शाळेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यवस्थेची जबाबदारी शाळा समितीवर आहे. मुख्याध्यापक हे शाळा समितीचे नियुक्त सचिव आहेत. सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकाची नियुक्ती अनिवार्य आहे. विद्यार्थी संख्येच्या आधारे मुख्याध्यापकांची पदे काढून टाकणे हे अन्यायाचे धोरण आहे. शाळेतील शिक्षकांची पदे निश्चित करणे आवश्यक आहे. तरच दर्जावान शिक्षण मिळेल. त्यामुळे, आता या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री  ( CM Fadanvis ) कोणती पाऊले उचलणार हे महत्वाचे आहे.
Powered By Sangraha 9.0