Muslim Entry Ban : पुण्याच्या गावात धक्कादायक फलक ! बाहेरच्या मुस्लिमांना प्रवेश निषिद्ध

Top Trending News    03-May-2025
Total Views |

musli
 
पुणे : ( Muslim Entry Ban ) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आपण संपूर्ण भारतभर पाहत आहोत. यात 26 पर्यटकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा सर्वत्र असंतोष निर्माण करत आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील पिरंगुट हे गाव चांगलेच चर्चेत आले आहे. पिरंगुट ग्रामस्थांनी 1 मे च्या ग्रामसभेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या गावाने एकत्र येऊन गावातील मशिदीत 'बाहेरील मुस्लिमांना बंदीचा निर्णय घेतला आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, या गावात मुस्लिमांची संख्या वाढल्याने हा निर्णय ( Muslim Entry Ban ) घेण्यात आला आहे.
 
पिरंगुट मशिदीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी करत होते. त्यात येणारे लोक नेमके कोण आहेत हे ओळखता येण्याची शक्यता नव्हती. या लोकांकडे कसलेही आयडेंटीटी कार्ड नव्हते. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक मुस्लीम बांधवही ( Muslim Entry Ban ) या बैठकीला उपस्थित होते. याबाबत पिरंगुटचे पोलीस पाटील प्रकाश पवळे सांगतात की, ग्रामस्थ मंडळींची मिटींग झाली. त्यात मुस्लीम तसेच मराठा सगळेच उपस्थित होते. आमचं गाव एकोप्याचं आहे. बाहेरील लोक अधिक येत असल्याने रहदारीला अडथळा येत आहे.

अचानक वाढला मुस्लिमांचा आकडा
 
आमच्या मशीदीत पहिल्यांदा 500 मुस्लिम बांधव येत होते. मात्र गेल्या तीन शुक्रवारी 2 ते अडीच हजार नागरिक येत होते. त्यामुळे आम्हाला अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्या ग्रामसभेला मुस्लिम बांधव देखील उपस्थित होते. आमचा पहलगाम हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे पवळे यांनी सांगितले. तरीही अचानक वाढलेल्या मुस्लिम बांधवांच्या संख्येने सगळेच आश्चर्यचकित होत आहेत.