हैदराबाद : ( Owaisi on Pakistan ) जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आपली कठोर भूमिका मंडळी आहे. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध कठोर पाऊले उचलून न्यायाची अपेक्षा केली आहे. 2019 च्या पठाणकोट हल्ल्यानंतर झालेल्या हवाई हल्ल्याचा संदर्भ देताना ओवैसी ( Owaisi on Pakistan ) म्हणाले की, त्यावेळी आमच्याकडे एक संधी होती. आपण लाँचिंग पॅड किंवा दहशतवादी आपल्या देशात प्रवेश करतात ती जमीन ताब्यात घेतली असती. मी मोदी सरकारला सांगू इच्छितो की, यावेळी आपण त्यांच्या घरात प्रवेश करुणाच होणार नाही तर आपण तिथेच बसले पाहिजे.
2019 मध्ये झालेल्या पठाणकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्याचाही उल्लेख करत ओवैसी ( Owaisi on Pakistan ) यांनी भारत सरकारकडून पाकिस्तानविरुद्ध निर्णायक कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी यावेळी म्हटले की फक्त त्यांच्या (पाकिस्तानच्या) घरात घुसून त्यांना मारू नका, तर घरात घुसून त्यांच्या समोर बसा आणि आपल्याला हवा तस घडवून घ्या. ओवेसी हे सर्व पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले, आम्हाला दहशतवाद थांबवायचा आहे त्यासाठी ते सरकारसोबत आहेत. देशातील जनतेला आशा आहे की सरकार सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटपेक्षाही अधिक मजबूत पावले उचलून झालेल्या घटनेचा न्याय करतील. त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी मोदी सरकारच्या कारवायांची दाखल घेतल्याची बाबा लक्षात येते.
पीओके भारताचा भाग - ठाम मत
पाकव्याप्त काश्मीरबाबत विचारलेल्या प्रश्नावर एमआयएम प्रमुख म्हणाले की, तो भारताचा भाग आहे आणि हा संसदेचा ठराव आहे. पीओके हा देशाचा अविभाज्य भाग आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. ते पुढे म्हणाले की, उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट हल्ल्यामुळे देशातील जनतेच्या मोदी सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारची प्रशंसा केल्याचे जाणवत आहे.