Pakistani spy : पाकिस्तानचा गुप्तहेर जैसलमेर मध्ये जेरबंद ! भारताच्या सुरक्षेला धोका

03 May 2025 19:46:11

paki
 
जैसलमेर : ( Pakistani spy ) राजस्थान इंटेलिजेन्सने जैसलमेरमधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पठाण खानला अटक केली आहे. त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्याच्यावर करडी नजर ठेवण्यात आली. यानंतर, त्याला चौकशीसाठी जयपूर येथील केंद्रीय तपास केंद्रात आणण्यात आले. या चौकशी दरम्यान असे उघड झाले की, तो आयएसआय हँडलरच्या ( Pakistani spy ) सूचनेनुसार भारताची गोपनीय माहिती शेअर करत होता. खान 2019 मध्ये पाकिस्तानला गेला. त्यांचे अनेक मित्र मंडळी आणि नातेवाईक तिथे राहतात. त्या काळात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात आला असावा, असा संशय तपास यंत्रणांना आहे.
 
आता जयपूरमध्ये अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
खानवर भारत आणि लष्कराशी संबंधित धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला पाठविल्याचे गंभीर आरोप आहे. त्याने आयएसआयला व्हिडीओ आणि फोटो पाठवले असल्याचे सांगितले जात आहे. पठाण बराच काळ पाकिस्तानी एजन्सीसाठी काम करत होता. महिन्याभरा पूर्वी त्याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0