Pollution Deaths : प्रदूषणामुळेही दरवर्षी सव्वालाख बालकांची कोवळी पानगळ

Top Trending News    03-May-2025
Total Views |

poll
 
नागपूर : ( Pollution Deaths ) जगभारत सर्वत्र देश पर्यावरण प्रदूषणाचा परिणाम दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफच्या आकडेवारीनुसार पर्यावरणीय कारणांमुळे दगावणाऱ्या प्रत्येक चार बालमृत्यूंपैकी एकाचा मृत्यू रोखता येऊ शकतो. कोवळ्या वयातील ही पानगळ थांबविण्यासाठी इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सने 'पर्यावरण आणि बाल आरोग्य' या थीमवर देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. यातून सामुदायिक जागरूकता कार्यक्रम, उपक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे जागरूक केले जात आहे. पर्यावरणीय कारणांमुळे होणाऱ्या आजारांविरुद्ध लढाई उभी करण्याचे आवाहन ( Pollution Deaths ) यातून केले जात आहे.
 
प्रदूषणाचा असा परिणाम
 
कोवळ्या वयातील मुले वजनांच्या प्रमाणात जास्त प्राणवायू शोषला जातो. त्यामुळे मुलांवर या विषारी घटकांचा दुष्परिणाम होतो. देशात दरवर्षी 1 लाख 16 हजार नवजात शिशूंचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतो, असे निदर्शनास आले आहे. कमी वजन, वेळेच्या आत जन्माला येणाऱ्या बहुतांश शिशूंची वाढ खुंटते. त्यामुळे अशा बालकांत दमा, फुफ्फुसांची क्षमता कमी होणे, मेंदूचा विकास मंदावणे आणि गर्भधारणेच्या गुंतागुंती ( Pollution Deaths ) होतात.
 
देशातील 70 टक्के जलस्रोत प्रदूषित आहेत. दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड, अतिसार यासारखे आजार उद्भवतात. ज्यामुळे दरवर्षी 2 लाखांहून अधिक बालके अकाली दगावतात. मुलांच्या शरीरात प्लास्टिकच्या कणांचे प्रमाण अतिशय धक्क्कादायक आहे. जे संप्रेरकांचे (हार्मोन्स) संतुलन बिघडवून मेंदूच्या विकासावर परिणाम करतात. ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीतून बाहेर पडणारे जड धातू आणि विषारी घटक मुलांच्या अवयवांना नुकसान पोहोचवतात त्यामुळेच कर्करोगाचा धोका वाढतो.
 
नॅशनल ग्रीन आर्मी
 
बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय वैज्ञानिक समन्वयक डॉ. गीता पाटील या वेळी म्हणाल्या प्रदूषणामुळे होणारी ही कोवळ्या वयातील पानगळीला ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणामुळे झोप, स्मरणशक्ती, वर्तन आणि अभ्यासावर यावर परिणाम करते. दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने चिंता आणि ऐकण्याच्या समस्या उद्भवू शकतात. हवामान बदल हा देखील चिंतेचा विषय आहे. आयएपीने शालेय मुलांद्वारे 'नॅशनल ग्रीन आर्मी' नावाचा एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, प्रत्येक शाळेत 10 विद्यार्थी आणि एका शिक्षकाची टीम तयार केली जाईल. ज्यांना प्रदूषण रोखण्यांदर्भात प्रशिक्षण दिले जाईल.