वृंदावन : ( Sant Premanand Maharaj ) रूपेश अलिकडेच आग्रा येथे त्यांच्या कामानिमित्ताने गेले होते. येथे त्यांना अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या स्वागत समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या आकृत्या वाळूत साकारल्या होत्या. आग्रा नंतर ते थेट वृंदावनला पोहोचले. प्रेमानंद महाराजांच्या अध्यात्मिक प्रीतीची ओढ त्यांना होती. या निमित्ताने त्यांनी आपली कला संत प्रेमानंद महाराजांना ( Sant Premanand Maharaj ) अर्पण केली.
वृंदावन येथील पवित्र भूमीवर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. जे अतिशय विलोभनीय आणि लोभस होते. जेव्हा प्रसिद्ध वाळू शिल्पकार रूपेश त्यांच्या टीमसह येथे आले आणि त्यांनी 200 किलो वाळूपासून संत प्रेमानंद महाराजांची भव्य मूर्ती तयार केली. जवळपास 8 तासांच्या कठोर परिश्रमानंतर ही कलाकृती साकार झाली. कलाकार रूपेश म्हणाले की, जेव्हा त्यांनी संत प्रेमानंद महाराजांचे प्रवचन ऐकले तेव्हा त्याचा मनात विचार आला की, हा आध्यात्मिक अनुभव त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपण व्यक्त करू शकलो तर खपाचा आंनद होईल ? महाराजांचा प्रत्येक शब्द माझ्या आत्म्याला स्पर्श करून गेला. मला वाटते की माझी कलादेखील एक आध्यात्मिक साधना आहे. ती अशा उदात्त कार्यासाठी वापरणे हे एक माझे भाग्यच आहे.