दिल्ली : ( Terrorist Pannu ) पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचे वातावरण तापले आहे. दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पन्नूने एका व्हिडीओ संदेशात म्हटले असे म्हटले आहे की, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर हे युद्ध भारत आणि पंतप्रधान मोदींसाठी शेवटचे युद्ध असेल. यात त्याने पंजाबी लोकांना उघड आव्हाहन केले आहे. हे युद्ध झाले तर भारताकडून पंजाबी पाकिस्तानी सैन्याला लंगर देण्यात येईल. नरेंद्र मोदींच्या आंधळ्या राष्ट्रवादी युद्धाला नाही म्हणण्याची वेळ आली आहे.
पंजाब मुक्तचा इशारा
त्यांनी म्हटले आहे, पाकिस्तानविरुद्ध लढू नका. पाकिस्तान तुमचा शत्रू नाही. पाकिस्तान शीख लोकांचा आणि खलिस्तानचा मैत्रीपूर्ण देश ( Terrorist Pannu ) आहे आणि राहील. एकदा आपण पंजाब मुक्त केला की, पाकिस्तान आपला शेजारी होईल. पन्नूने भारतीय सैन्यातील शीख सैनिकांना आवाहन केले आहे की जर भारताने पाकिस्तानशी युद्ध केले तर त्यांनी लढाईत सामील होऊ नये. इस्लामाबाद हे शीख आणि खलिस्तानचे मित्र असल्याचे त्याने म्हटले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांना हल्ल्याला देशाच्या प्रत्युत्तराची वेळ, लक्ष्य आणि पद्धत निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. यानंतर आता पन्नू शीख सैनिकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.