Mock Drill Before Strike : ऑपरेशन सिंदूरपूर्वीच सरकारने भारतीयांना दिला होता सुचक संदेश

07 May 2025 12:31:58

mock
 
दिल्ली : ( Mock Drill Before Strike ) युद्ध प्रारंभ म्हणजे शंखनाद करुन आपल्या विजयाची आणि उत्साहाची सुरुवात करणे. यावेळी डमरू वाजविले जातात, ढोल बडवले जातात आणि आपण किती ताकदवान आहोत, याची कल्पना शत्रुंना दिली जाते. यासाठी वाद्य वाजविले जातात. भारत सरकारच्या वतीने बुधवारी संपूर्ण देशात मॉकड्रिलची ( Mock Drill Before Strike ) घोषणा करण्यात आली. या माध्यमातून एका अर्थाने आपणही पाकिस्तानवर मोठा हल्ला प्रारंभ करणार आहोत, याचा सूचक संदेश देण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या वतीने करण्यात आला. परंतु, कोरोना काळात थाळ्या वाजविल्या तशा मॉकड्रिलच्या नावाने हॉर्न वाजवण्याच्या नावावर मोदी सरकारची खिल्ली उडविण्यात आली आहे. आजची स्थिती पाहता, मोदी सरकारने युद्ध प्रारंभ करत असल्याचे किंवा पाकिस्तानवर हल्ला चढविणार असल्याचा सूचक संदेश दिला होता. जाणकारांच्या मते देशात आनंद, उत्सव साजरा करा हाही अर्थ मॉकड्रिलचा ( Mock Drill Before Strike ) होता.
 
मॉकड्रिलच्या मध्यातच पाकिस्तानवर एअर स्ट्राइक
 
मॉकड्रिल च्या तयारीच्या माध्यतच भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केली आहे. महाराष्ट्रातील मॉक ड्रिलसाठी निवड केलेली ठिकाणे अशाप्रकारे आहेत. मुंबई, पुणे, नासिक, उरण, तारापूर, रोहा-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पार्किंग-चिंचवड़, छत्रपति संभाजीनगर (औरंग), भुसावल, रायगढ़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि थाल-वैशेट. या मॉक ड्रिल मध्ये हवाई प्रवाशांसाठी अलर्ट, आपातकालीन परिस्थितीची संभाव्यता सार्वजनिक सुरक्षा उपायांसाठी तयार आहोत. सिविल डिफेंस वॉर्डन, होमगार्ड, स्वयंसेवक, एनसीसी, एनएसएस व स्थानिक निवासी यांचा समावेश आहे.
 
महाराष्ट्रातील १६ ठिकाणी युद्धाचे सायरन वाजणार
 
पहलगाम हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा सायरन वाजणार ( Mock Drill Before Strike ) आहे. बुधवारी, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्रातील ठाणे आणि पुणे यासारख्या प्रमुख शहरांमध्ये १६ ठिकाणी हल्ला झाल्यास आपत्कालीन तयारीची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मुख्य सचिव आणि गृह सचिवांसोबत बैठक घेतली होती.
 
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय गृह मंत्रालयाने ७ मे रोजी देशव्यापी नागरी संरक्षण सरावाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्र नागरी संरक्षण संचालक प्रभात कुमार म्हणाले की, बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. यामध्ये विशेषतः किनारी भागांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील सर्व एजन्सी या मॉक ड्रिलमध्ये भाग घेतील ज्यामध्ये सुमारे १०,००० प्रशिक्षित स्वयंसेवक सहभागी होतील.
 
 
पाकिस्तानवरील एअर स्ट्राइक -  
 
 
 
  
Powered By Sangraha 9.0