Sindoor Strike : चुटकीभर सिंदूरची किंमत आता पाकला कळाली !

08 May 2025 17:39:53
 

sindoor 
 
दिल्ली : ( Sindoor Strike ) सिंदूर हे विवाहित हिंदू महिलांचे प्रतीक आहे. काही परंपरेत सिंदूर देवी पार्वतीशी संबंधित आहे. ज्याला वैवाहिक भक्तीचे प्रतीक मानले जाते. भारतात योद्धे त्यांच्या कपाळावर एक तिलक किंवा टिळा लावतात. जो बहुतेकदा सिंदूर पासूनच बनलेला असतो. राजपूत आणि मराठा योद्धे कपाळावर हे तिलक धारण करततात. सीमापार हल्ल्यांच्या पहिल्या घोषणेत, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर नावाची प्रतिमा वापरली. आता पाकिस्तानला चांगलेच समजले आहे की, भारतासाठी चिमूटभर सिंदूरची किंमत ( Sindoor Strike ) काय आहे.
 
पहलगामध्ये हिंदू पर्यटकांना त्यांच्या पत्नीसमोर ठार करून त्यांचे कुंकु पुसल्या ( Sindoor Strike ) गेले. त्या महिलांच्या कुंकवाची अर्थात सिंदूरची किंमत काय असते हे आता पाकिस्तानला समजले असेल. कारण बुधवारी भारताने पहलगाम येथेल क्रूर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर हल्ले करून त्यांना उद्धवस्त केले. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर ( Sindoor Strike ) असे नाव देण्यात आले.
 
या कारवाईत विशेष प्रकारची शस्त्रे वापरली गेली. या हल्ल्यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने एकत्र काम केले. तिन्ही सैन्याने अचूक शस्त्रे वापरली, ज्यात लोटेरिंग शस्त्रे देखील समाविष्ट होती. गुप्तचर संस्थांनी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळ कुठे आहेत याची माहिती दिली. यानंतर भारतीय सैन्याने त्या तळांवर हल्ला केला. हे हल्ले भारतीय भूमीतूनच करण्यात आले. हे हल्ले भारताच्या राफेल या विध्वंसक विमानाने केले होते. यामध्ये स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्रे, हॅमर क्षेपणास्त्र आणि आत्मघाती ड्रोनचा वापर करण्यात आला.
 
राफेलची मारक क्षमता 3,700 किमी
 
भारतीय हवाई क्षेत्रात राहून राफेल लढाऊ विमानांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. राफेल हे 4.5 पिढीचे मल्टी रोल फायटर प्लेन अर्थात बहु-भूमिका लढाऊ विमान आहे. जे त्याच्या प्रगत तंत्रज्ञानासाठी आणि अग्निशक्तीसाठी ओळखले जाते. राफेल-एम ताशी 2.202 किलोमीटर वेगाने उड्डाण करते. त्याची मारक क्षमता 3,700 किलोमीटर आहे. राफेल हे लढाऊ विमान लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी अतिशय योग्य मानले जाते. राफेल-एम हे विमानवाहू जहाजांवरून चालवण्यासाठी डिझाइन केलेले आहे, ज्यामुळे ते नौदल युद्धात धोकादायक बनते.
 
स्कॅल्प/स्टॉर्म शॅडोने नष्ट केले दहशतवाद्यांचे अड्डे
 
स्कॅल्प हे हवेतून डागले जाणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे ज्याला स्टॉर्म शॅडो असेही म्हणतात. हे त्याच्या गुप्त वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. लांब पल्ल्याच्या खोल प्रहारांसाठी डिझाइन केलेले आहे. सर्व हवामानात काम करण्यास सक्षम असल्याने रात्री तत्परतेने काम करणारे जगभरातील संरक्षण दलांमध्ये हे आवडते आहे. 450 किमीच्या पल्ल्यासह, स्कॅल्प क्षेपणास्त्राची अचूकता तर आहेच सोबत त्याची प्रगत नेव्हिगेशन सिस्टम अधिक प्रभावीपणे कार्य करते. आयएनएस, जीपीएस आणि भूप्रदेश संदर्भ वापरते. हे क्षेपणास्त्र युरोपियन युनियनमधील एमबीडीए या संस्थेने बनवले आहे. हे शस्त्र मजबूत बंकर आणि दारूगोळा डेपोमध्ये घुसण्यासाठी एक आदर्श मानले जाते. युक्रेनने याच क्षेपणास्त्राचा वापर करून गेल्या वर्षी पहिल्यांदाच रशियाच्या आतल्या लक्ष्यांवर हल्ला केला होता. हे क्षेपणास्त्र 450 किलो वजनाचे अण्वस्त्र वाहून नेने शक्य आहे. जेटमधून डागल्यावर ते कमी उंचीवर उडत असल्याने ते शोधणे कठीण आहे.
 
आत्मघातकी ड्रोन
 
सुसाइड ड्रोनना एलएमएस म्हणजेच लोइटरिंग म्युनिशन सिस्टम ड्रोन / सुसाइड / कामिकाझे ड्रोन असेही म्हणतात. लक्ष्य निश्चित झाल्यानंतर हे ड्रोन स्फोट होतात. या ड्रोनची खास गोष्ट म्हणजे ते लपून राहून लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे. या आत्मघाती ड्रोनचे उड्डाण मध्येच बदलले जाऊ शकते किंवा रद्द केले जाऊ शकते. हे शस्त्रे वाहून नेणारे ड्रोन आहे. जे सतत हालचाल करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. लक्ष्य ओळखल्याशिवाय ते फिरत राहते. हे थोड्या काळासाठी बाहेर पडतात. कोणत्याही उच्च मूल्याच्या शस्त्रास्त्रांचा वापर न करता लक्ष्यांवर मारा ( Sindoor Strike ) करू शकतात.
 
हवेतून जमिनीवर माऱ्याची क्षमता
 
या ऑपरेशनमध्ये वापरले जाणारे दुसरे शस्त्र म्हणजे हॅमर (हायली अ‍ॅजाइल मॉड्यूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज) हा सर्व हवामानात हवेतून जमिनीवर मारा करणारा अचूक बॉम्ब आहे. याला ग्लाइड बॉम्ब असेही म्हणतात ज्याची मारक क्षमता 70 किलोमीटरपर्यंत असते. ते 250 किलो, 500 किलो किंवा 1,000 किलो वजनाच्या बॉम्बमध्ये बसवता येते. फ्रेंच कंपनी सफ्रानने बनवलेला हा बॉम्ब अडथळ्यांना संवेदनशील नाही आणि खडबडीत भूभागावर कमी उंचीवरून डागता येतो ( Sindoor Strike ). ते थांबवणे कठीण आहे. ते मजबूत संरचनांमध्ये प्रवेश करू शकते, ज्यामुळे ते प्रभावी ठरते.
 
 पंतप्रधान म्हणाले की, दहशतवाद्यांनी माता आणि बहिणींच्या कुंकवावर हल्ला ( Sindoor Strike ) केला. पण दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना हे सांगायला हवे की आपल्या माता-भगिनींच्या भांगातील कुंकू त्यांना कमकुवत करत नाही. आपल्या देशात अशी अनेक उदाहरणे आहेत. 
Powered By Sangraha 9.0