Fake Birth Death Certificate : सत्य आले समोर ! नायब तहसीलदारांनी दिलेले जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द

Top Trending News    09-May-2025
Total Views |

birth
 
नागपूर : ( Fake Birth Death Certificate ) बनावट कागदपत्राच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांनी रहिवासी दाखल्यासाठी बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जन्म व मृत्यू प्रमाणपत्राचा ( Fake Birth Death Certificate ) वापर रहिवासी दाखल्यासोबत दस्त नोंदणी, शिक्षण व इतर शासकीय लाभांसोबत वैयक्तिक लाभासाठी करण्यात येते. त्यामुळे प्रमाणपत्रच्या आधारे अनेक व्यवहार होण्याची शक्यता आहे. यामुळे रेशनकार्डही तयार होण्याची शक्यता आहे. तसेच योजनांचा लाभ लाटण्यात आल्याचा अंदाज सुद्धा वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राच्या आधारे इतर व्यवहार झाले असल्यास त्याचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
 
महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी ( Fake Birth Death Certificate ) विभागामार्फत अशी 783 प्रकरणे समोर आली. यामध्ये नायब तहसीलदारांच्या आदेशावर आधारित प्रमाणपत्रे विलंबाने नोंदवून देण्यात आली होती. ही सर्व प्रमाणपत्रे आता अमान्य घोषित करण्यात आली आहे. या सर्व कार्यालयांना प्रमाणपत्रांवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत महानगरपालिकेत दोन वेळा पाठपुरावा केला होता. आता 11 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 दरम्यान नायब तहसीलदार व तहसील यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेले सर्व जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. सोमय्यांनी सांगितले, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील तहसीलदारांनी 1,234 प्रमाणपत्रे दिल्याचे सांगितले, तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फक्त 639 प्रकरणांमध्येच एनओसी दिल्याचे स्पष्ट केले. यामध्ये सुमारे 600 एनओसी कुठून आल्या ? हा मोठा प्रश्नचिन्ह ठरत असून, याची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.