जम्मू : ( Hajipir Strategic Location ) जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) गावे आणि शहरांवर पाकिस्तान सतत बॉम्बफेक करत आहे. पाकिस्तानमुळे पुंछ हा सर्वात जास्त प्रभावित भागांपैकी एक आहे. जम्मू विभागात असलेले पूंछ हा जिल्हा 1,674 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. ते तीन बाजूंनी नियंत्रण रेषेने (एलओसी) वेढलेले आहे. या जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगराळ प्रदेश विशेषतः पीर पंजाल पर्वतरांगा, जी त्याला काश्मीर खोऱ्यापासून वेगळे करते. पुंछ शहर नियंत्रण रेषेजवळ असल्याने ते सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबार आणि तोफखान्यांच्या हल्ल्यांना बळी पडते. हे एक सोपे लक्ष्य आहे. गोळीबार करून पुंछमधून लोकांना स्थलांतरित करण्यास ( Hajipir Strategic Location ) प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो
.
पूंछचे महत्त्व - हाजीपीर खिंड
जानेवारी 1966 मध्ये ताश्कंद घोषणेनंतर भारताने हा खिंड पाकिस्तानला सोपविला. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने तो ताब्यात घेतली. जर भारताने हा धोरणात्मक खिंड पाकिस्तानला परत केला नसता तर परिस्थिती वेगळी असती. जर आमच्याकडे हा खिंडार असता तर, पीओके आमच्या थेट सीमेत आला असता. आता या खिंडीचा वापर भारतात दहशतवादी पाठवण्यासाठी केला जातो आहे. हाजीपीर खिंड हा एक पर्वतीय खिंड असून तो सध्या पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये स्थित आहे. हाजीपीर खिंड ( Hajipir Strategic Location ) उरीला पीर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेस असलेल्या पूंछशी जोडते. जर तत्कालीन सरकारने ते पाकिस्तानला दिले नसते तर आजची परिस्थिती वेगळी असती.
पूंछ येथील सीमेपलीकडून पाकिस्तानी गोळीबारात एका गुरुद्वारालाही लक्ष्य केले आहे. शीख समुदायाने हार ना मानता आपल्या मनाची भीती मागे टाकत, गुरुद्वारा पुन्हा भाविकांसाठी उघडण्यात आला आणि पुन्हा तिथे अरदास सुरू झाली. लोकांच्या श्रद्धेने पाकिस्तानच्या नापाक कारस्थानांना योग्य उत्तर दिले आहे. या हल्ल्यात गुरुद्वाराच्या भिंतींवर स्फोट झाला असून गोळ्यांचे निशाण स्पष्टपणे दिसत आहेत.