Pakistani Citizen Exposed Govt : पाकिस्तानी नागरिक करतोय आपल्याच देशाची पोलखोल !

09 May 2025 22:29:15

ppp
 
इस्लामाबाद : ( Pakistani Citizen Exposed Govt ) भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, आता पाकिस्तानी नागरिकच आपल्या सैन्यावर संतापलेले दिसत आहे. ते स्वतःच आपल्या पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश करत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे एक नागरिक पाकिस्तानी संरक्षण यंत्रणेला शिव्या देत आहे. तो म्हणतो, भारताने आमच्यावर 24 क्षेपणास्त्र हल्ले केले. धक्कादायक बाबा म्हणजे सर्व 24 क्षेपणास्त्रांनी त्यांचे लक्ष्य गाठले. पाकिस्तानी संरक्षण यंत्रणा एकाही क्षेपणास्त्राला रोखण्यात यशस्वी ठरली नाही. भारताचे जे लक्ष्य होते ते त्यांनी पूर्ण केले. पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून तो म्हणाले, आता काही लोक म्हणतील की मी भारताचे कौतुक करतोय, पण सत्य हे सत्य आहे.
 
आमच्यावर क्षेपणास्त्रे पडली आहेत. संपूर्ण जगाने ते पाहिले आहे. भारताने आपल्या लष्करी ठिकाणांवर हल्ला केला नाही, याबद्दल तुम्ही आभारी असले पाहिजे. जर त्यांनी हवाई तळावर किंवा कोणत्याही छावणीवर हल्ला केला असता तर प्रकरण संपले असते. काहीही शिल्लक राहिले नसते. पाकिस्तानी सैन्याची ( Pakistani Citizen Exposed Govt ) तुलना इस्रायली संरक्षण यंत्रणेशी करताना, पाकिस्तानी नागरिक म्हणाले की, इराणने इस्रायलवर 200 क्षेपणास्त्रे, 300 क्षेपणास्त्रे डागली आणि क्वचितच एकही क्षेपणास्त्र इस्रायलवर मारा करू शकले. इस्रायल त्यांना हवेतच अडवतो, हवेतच नष्ट करतो. तशीच परिस्थिती इथे सुद्धा दिसत आहे. आपण 24 क्षेपणास्त्रेही रोखू शकलो नाही. सर्व 24 क्षेपणास्त्रे आमच्याच डोक्यावर पडली.
Powered By Sangraha 9.0