RSS Modi Directive : भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर संघाने मोदी सरकारला काय दिले आदेश

09 May 2025 14:00:10

rss direc
 
दिल्ली - ( RSS Modi Directive ) पहलगाम येथे निहत्था पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेवर निर्णायक कारवाई केल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्र सरकारच्या नेतृत्वाचे आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आहे. हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडात पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय देण्यासाठी केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि मनोबल वाढला असल्याचे गौरवोद्गार संघाने काढले.
 
आज संघाने एक्सवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून परिपत्रक जारी केले. देशाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन प्रणालींवर लष्करी कारवाई करणे आवश्यक आणि अपरिहार्य आहे. यावर संघ पूर्णपणे सहमत आहे. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी भावनेने आणि कृतीने उभा असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले ( RSS Modi Directive ) आहेत.
 
भारताच्या सीमेवरील धार्मिक स्थळांवर आणि नागरी वस्तीवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करत आणि या क्रूर, अमानवी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रति संघाने संवेदना व्यक्त केल्या.
 
या आव्हानात्मक काळात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( RSS Modi Directive ) सर्व नागरिकांना सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन करतो. यासोबतच, आपले पवित्र नागरी कर्तव्य पार पाडताना, आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे कोणतेही राष्ट्रविरोधी षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नये, असे आवाहन करत, संघाने सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी आपली देशभक्ती दाखवावी आणि आवश्यकतेनुसार सैन्य आणि नागरी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार राहावे आणि राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी द्यावी असे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0