( Rauf Asghar Killed ) भारतीय प्रवासी विमानाचे 1999 साली अपहरण झाले होते. इंडियन एअर लाईन्सची फ्लाईट काठमांडू येथून दिल्लीला येत होती. तिचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यावेळी त्यात 176 प्रवासी आणि 15 केबिन क्रु होते. भारतीच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी विमान अपहरणाची घटना होती. अपहरणकर्त्यांनी हे विमान अमृतसर, लाहोर, दुबई आणि शेवटी अफगाणिस्तानातील कंदहार येथे गेला.
येथे प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर सह 3 दहशतवादी सोडले होते. या अपहरणाचा मास्टरमाईंड हा रौफ असगरच होता. या विमानाला अफगाणिस्तानच्या कंदहार येथे नेण्यात आले. या विमानाच्या बदल्यात कुख्यात दहशतवादी अजहर मसुदची सुटका करून घेणारा, या हायजॅकचा मास्टर माईंड रौफ असगर ( Rauf Asghar Killed ) हा ठार झाला आहे. हा भारतीयांकडून केलेल्या हल्ल्यात ठार झाला आहे. अझहर मसुदच्या कुटुंबातील 10 सदस्य ठार झाले असल्याची माहिती मिळते आहे. यात रौफ असगरही ठार झाल्याचे समजते.