Ajit Pawar : राकाँने केली पुण्याची विभागणी, दोन शहराध्यक्षांच्या माध्यमातून पोहोचणार घराघरात

Top Trending News    01-Jun-2025
Total Views |

ajit
 
पुणे : ( Ajit Pawar ) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडविल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नुकतीच भाजपाने राज्यातील जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली. अशात पुण्याचे रणशिंग जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात दोन जिल्हाध्यक्ष उतरविले आहेत. पुणे जिल्ह्याचा झपाट्याने होणारा विकास, शहराच्या रुंदावत जाणा-या सीमा आणि अशात मतदारांची वाढती संख्या पक्षाच्या वतीने वळविण्यासाठी राष्ट्रवादीने खेळलेली ही खेळी ( Ajit Pawar ) आहे.
 
पुण्यात राष्ट्रवादीचा मतदारवर्ग मोठा असला तरी, आयटीहबच्या निमित्ताने पुण्यातील दिवसागणिक वाढत जाणारी मतदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसाठी धोक्याची घंटा वाजवू शकते. त्यामुळे पिढीजात मतदारांसोबतच नवीन मतदारांना आपलेसे करण्यात राष्ट्रवादीचे संघटन व्यस्त असल्याचे देखील दिसत आहे. अशात पक्षाचा आणि त्यापाठोपाठ कर्तव्यनिष्ठ पदाधिकाऱ्यांचा वाढलेला ताण बघता राष्ट्रवादीने दोन जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून पुण्याला बळकटी देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलल्या जात ( Ajit Pawar ) आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत भाजपाने देखील असाच निर्णय नागपूरसाठी घेतल्याचे बघायला मिळाले होते. नागपूर हा भाजपाचा गढ असला तरी, तिथले राजकारण कधी काँग्रेसच्या बाजूने वळेल हे सांगता येत नाही. मुळात ही बाब आजच्या सत्तेतल्या नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे. नागपुरात शहर काँग्रेसमध्ये असलेले माजी मंत्री सतीश चर्तुवेदी यांच्यापासून ते आजचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मतदारांपर्यत एक मोठी फळी आहे. जी काँग्रेसला ( Ajit Pawar ) साथ देते. इतकेच नव्हे तर काटोल विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तसेच राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख असतील किंवा सावनेर विधानसभेतील माजी आमदार सुनील केदार यांचेही वन मोठे आहे.
 
इतकेच नव्हे तर भौगोलिक दृष्ट्या नागपूर ग्रामीणचा पट्टा प्रचंड मोठा असून, तो एक किंवा दोन दिवसांत गाठणं वाटते तेवढे सोपी नाही. अशात भाजपाच्या वतीने नागपूर ग्रामीणतर्फे दोन जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीणच्या राजकारणाला विशेष बळकटी देत अनिल देशमुख आणि सुनील केदार यांचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्नच मुळात भाजपाच्या वतीने होताना दिसणार आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात ( Ajit Pawar ) काही बदल केले आहेत. पुणे शहराचे पूर्व पुणे व पश्चिम पुणे असे दोन भाग करून प्रत्येक भागासाठी एक शहराध्यक्ष व दोन कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे. शहराचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. यात कसबा, कॅन्टोन्मेंट हडपसर व वडगाव शेरी या चार मतदारसंघांचा मिळून पूर्व पुणे करून येथे शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे यांची, तर कार्याध्यक्षपदी रूपाली ठोंबरे व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून हाजी फिरोज शेख यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
पश्चिम पुण्यामध्ये पर्वती, खडकवासला, कोथरूड व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पश्चिम पुण्याच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची, तर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. दुसरे कार्याध्यक्ष म्हणून अक्रूर कुदळे यांची निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी या निवडीची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सर्वांना नियुक्तिपत्रे दिली आहेत. अजित पवार यांच्या सूचनेवरून आमदार चेतन तुपे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.