नागपूर : ( Chandrashekhar Bawankule ) राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठी विधानसभा मतदारसंघातील मधील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांनी निवेदने सादर केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांना भेटण्यासाठी कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. विविध समाजातील युवक , महिला आणि ज्येष्ठ नागरिक जनसंवाद कार्यक्रमात निवेदन घेऊन सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे दररोज निर्माण होणाऱ्या मुलभूत समस्यासह रोजगार आणि वैय्यक्तिक कामासंबंधी निवेदन देण्यात आली. संबंधित निवेदनाची दाखल घेत उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. या वेळी एक एक करत विविध समस्यांबाबत नागरिकांची निवेदन स्वीकारत चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रत्येक नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत असताना त्यांना समस्याबाबत आश्वस्त केले.
अशी निवेदन
यावेळी कामठी येथे उभारण्यात आलेल्या मॉलमध्ये उद्योगासाठी गाळे देण्यात आले. रमाई आवास योजनेअतर्गत 70 लाभार्थींना एक-एक लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आहे. तर, काहीना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. तसेच, या वेळी कामठी शहरातील अतिक्रमण, पिण्याच्या पाण्याची समस्या रस्ते, कृषी, धार्मिक सांस्कृतिक, क्रीडा, सांस्कृतिक, म्हाडाची घरे आदी क्षेत्रांशी संबंधित निवेदने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांना सोपविण्यात आली. यावेळी बावनकुळे यांनी नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत समस्या ऑन द स्पॉट सोडवता याव्यात, हा उद्देश ठेवून या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यासोबतच यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर, जिल्हा सरचिटणीस अनिल निधान, रिंकेश चवरे, अजय अग्रवाल, उमेश रडके, राज हाडोती, संजय कनौजीयाआदी उपस्थित होते.
सर्व वयोगटातील समस्या
विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी यांनी सुद्धा आपल्या मांडल्या. बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात समाजातील सर्व वर्गातील व सर्व वयोगटातील नागरिक आले होते. मात्र, आजच्या जनसवांद कार्यक्रमाला दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळही आले होते. विशेषतः विद्यार्थ्यांनी खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात अली आहे.