नागपूर : ( Education Department Scam ) राज्यभरात बोगस शालार्थ आयडीचा घोटाळा गाजत असतांनाच आणखी एक नवीनच प्रकरण पुढे आला आहे. एका शिक्षिकेवर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्याय केल्याची घटना उघडकीस आली आहे. पदाधिकाऱ्यांनी शिक्षिकेची पदोन्नती रोखल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर या कामात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक ड शिक्षणाधिकाऱ्यानेही या कामात सहकार्य केले आहे. शिवाय, त्या शिक्षिकेला 6 महिन्यांचा पगारही दिला नाही.
असे आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीलकमल कृपाकर यांची 2005 मध्ये दिघोरीच्या सर्वश्री प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. सप्टेंबर 2023 मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा बांते या निवृत्त झाल्या ( Education Department Scam ). त्यावेळी या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 93 होती. 3 ऑक्टोबरला नीलकमल शिकवण्यासाठी शाळेत गेल्या आणि रिकामा वर्ग पाहून चकित झाल्या. त्यांनी शाळेचे व्यवस्थापकीय सचिव राजेश मासूरकर यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी पटसंख्या शून्य असल्याच्या कारणावरून तुमची सेवा समाप्ती करण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले. अचानक आलेल्या या निर्णयाने नीलकमल या हादरून ( Education Department Scam ) गेल्या.
याचा काळात संचालकांनी आणखी एक निर्णय घेतला. त्यांनी संगणमतांनी हेमराज धोटे याचा मुख्याध्यापक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवला. नीलकमल या सेवा ज्येष्ठतेनुसार सिनियर असूनही संयुक्त समितीने हा निर्णय कसा घेतला, याचे आश्चर्य आहे. या सर्व प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नीलकमल यांनी संचालकांना सव्हीस बुक मागितली. पण ते त्यासाठी टाळाटाळ करू लागले. अरुणा बांते निवृत्त झाल्या असतानाही त्यांना मुख्याध्यापक दाखविण्यात आले आणि त्यांना पगारही देण्यात आला. नीलकमल यांनी आरटीआय अंतर्गत सर्व कागदपत्र गोळा करून तत्कालीन उपसंचालक उल्हास नरड यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी शिक्षणाधिकारी काळुसे यांना जबाबदार लोकांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. मात्र, काळुसे यांनी हे प्रकरणच दाबून टाकले. अखेर नीलकमल यांनी हुडकेश्वर पोलिसात तक्रार ( Education Department Scam ) केली आहे.
या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी शिक्षिकेच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकाऱ्यासह दिघोरी येथील सर्वश्री उच्च प्राथमिक शाळेचे पदाधिकारी आणि माजी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, संगीता विश्वनाथ रहाटे, शाळा सचिव राजेश, काशीनाथ मासूरकर, भारती दीपक खडसे, ऐश्वर्या राजेश मासूरकर, प्रकाश काशीनाथ मासूरकर, सुनील उदयभान तायवाडे, सुनीता लक्ष्मण झोडे आणि अरुणा रमेश बांतेचा समावेश आहे.