Vastu Remedy : लिंबू-पाण्याचं अद्भुत रहस्य ! घरबसल्या दूर करा वास्तुदोष

10 Jun 2025 22:15:42

limbu
 
वास्तुशास्त्रानुसार ( Vastu Remedy ) लिंबूमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची जबरदस्त क्षमता असते.त्यामुळेच आपण आपल्या आजूबाजूला घराच्या आणि दुकानाच्या मुख्य दारावर हिरवी मिरची, लसूण आणि लिंबू टांगतात, असे मानले जाते की लिंबू वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. लिंबाचा वापर घर आणि दुकान या दोन्हींना नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी केला जातो. महत्वाचे म्हणजे लिंबू सर्वत्र सहज उपलब्ध असते. तसेच, ते महाग नसल्यामुळे देखील ते सर्वात जास्त वापरले जाते. एका ग्लासमध्ये लिंबू पाण्यासोबत ठेवल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा लवकर दूर होते. हा वास्तु उपाय ( Vastu Remedy ) कसा आणि कधी करावा, याबाबत आज आपण जाणून घेऊया.
 
सकारात्मकता मिळण्यासाठी
 
संपूर्ण लिंबू आणि पाणी एका ग्लास पाण्यात एक संपूर्ण लिंबू घाला. हे बेडरूममध्ये, जेवणाचे टेबल आणि मुलांच्या अभ्यासाच्या किंवा तुम्हाला गरज वाटत असेल तेथे ते शकता.
 
तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी
 
घरातील सदस्य कोणत्याही कारणाशिवाय तणावात असतील तर ते वास्तुदोषांमुळे ( Vastu Remedy ) असू शकते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लिंबूचे छोटे तुकडे करून ग्लास किंवा भांड्यात पाण्यात टाकून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा. हे फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत करा. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन लिंबू आणि पाणी वापरा. दोन ते तीन आठवड्यांनंतर परिणाम दिसून येईल. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि घर शुद्ध होईल.
 
दोष दूर करण्यासाठी
 
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका ग्लास पाण्यात लिंबू ठेवल्याने प्रवेशद्वाराचे वास्तू दोष दूर होतात. परंतु, हा उपाय सकाळी करणे अनिवार्य आहे.
 
नकारात्मक ऊर्जेसाठी
 
एका ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्या पाण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा क्षेत्र जसे की शौचालय, स्नानगृह आणि गडद कोपरे पुसून टाका आणि नंतर ते पाणी घराबाहेर फेकून द्या.
 
 
Powered By Sangraha 9.0