Kitchen Vastu Secrets : स्वयंपाकघरात 'हे' फोटो लावले की घरात येते समृद्धीची चव !

11 Jun 2025 17:07:02


annapurn

आपण ( Kitchen Vastu Secrets ) ज्या घरात राहतो ते नेहमी पॉसिटीव्ह असावे असे आपल्याला वाटते. ते नीटनेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो.आपल्या प्रत्येकाच्या घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर किंवा आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर किचन. घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात ते आपला सर्वांचं स्वयंपाकघर असत. मात्र, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे. स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य बदल केल्यास वास्तुदोष दूर होऊन आपणास धनलाभाचे योग प्राप्त होऊ शकतात. स्वयंपाकघरात तुम्ही जर काही फोटो लावले तर धनधान्याची भरभराट होते. हे कोणते फोटो आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.

अन्नपूर्णेचे चित्र

स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. कारण, ती आपल्या सर्वांची अन्नपूर्णा आहे. म्हणून, त्याच्या सौंदर्याची आणि नशीबाची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. स्वयंपाक घरात आई अन्नपूर्णेचे चित्र असणे अनिवार्य ( Kitchen Vastu Secrets ) आहे. तसेच, तुमच्या स्वयंपाकघरात फळे आणि भाज्यांनी भरलेले एक सुंदर चित्र लावलेले असावे. ही चित्रे स्वयंपाकघरात लावल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासणार नाही. धन-धान्याचा साठा नेहमी भरलेला असतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते. याशिवाय, जर तुमचे स्वयंपाकघर वास्तुनुसार आग्नेय-पूर्व किंवा दक्षिण दिशेला बनवलेले नसेल किंवा वास्तूशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर स्वयंपाकघराच्या उत्तर-पूर्व दिशेला सिंदूरी रंगाची गणपतीची मूर्ती स्थापना करा. म्हणजेच, गणपतीचा फोटो लावा.
 
 
Powered By Sangraha 9.0