Gujarat Plane Crash : अक्षरश: मृत्यूतांडव, सर्वत्र विखुरलेले मृतदेह अन् डोके शरीरापासून वेगळे

12 Jun 2025 22:30:07

air plane
 
अहमदाबाद - ( Gujarat Plane Crash ) टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेजच्या यूजी हॉस्टेलवर कोसळले. सिव्हिल हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, विमान निवासी भागात कोसळल्याने 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. धावपट्टी 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातस्थळी धुराचे लोट दिसू लागले आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ही दुर्घटना गुजरातच्या प्रमुख शहरातील दुसरी हवाई दुर्घटना आहे. 19 ऑक्टोबर 1988 रोजी अहमदाबाद विमानतळावर शेवटच्या क्षणी इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले, ज्यामध्ये 130 लोकांचा मृत्यू झाला.
 
बचाव पथके घटनास्थळी मोठी गर्दी
 
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या, डझनभर रुग्णवाहिका आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. विमानतळ प्राधिकरण आणि आपत्कालीन सेवा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'इंजिनमधून मोठा आवाज आला, त्यानंतर अचानक मोठा स्फोट झाला. विमान इमारतीवर आदळताच त्याला आग लागली आणि संपूर्ण परिसर धुराने भरला. हा धूर अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होता.' या अपघाताने अहमदाबादमधील लोकांना धक्का बसला ( Gujarat Plane Crash ) आहे. लोक त्यांच्या घरांच्या छतावर आणि रस्त्यावर आले. तांत्रिक बिघाड, पक्ष्याशी टक्कर किंवा पायलटची चूक अशा अपघातामागील सर्व शक्यतांवर तपास सुरू झाला आहे. एअर इंडिया आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या पथके तपासासाठी घटनास्थळी दाखल झाली.
 
डोके शरीरापासून वेगळे झाले
 
स्फोट इतका भयानक होता की मृतदेह जवळच्या रस्त्यांवर विखुरलेले ( Gujarat Plane Crash ) दिसले. जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. काही लोक रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या कापलेल्या डोक्याचा व्हिडीओ बनवताना दिसले. विमानात झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की अनेक लोकांचे मृतदेह रस्त्यावर पडले. अनेक जळालेल्या मृतदेहांना घटनास्थळावरून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. सर्व मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहेत. लोकांची ओळख पटवण्याच्या स्थितीतही नाही. रुग्णालयात आणलेले बहुतेक मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. टक्कर इतकी जोरदार होती की विमानाचा एक भाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घुसला. विमानात बसलेल्या प्रवाशांच्या ट्रॉली-बॅग्ज अपघातस्थळी विखुरलेल्या ( Gujarat Plane Crash ) आहेत, ज्या बचाव कर्मचारी काढून टाकत आहेत. सिव्हिल हॉस्पिटल इमारतीजवळ उभ्या असलेल्या अनेक वाहनांनाही आग लागली.
 
 
Powered By Sangraha 9.0