Air India Jolt : फक्त काही सेकंदांनी उड्डाण थांबलं ! एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड

16 Jun 2025 18:43:58

jolt air
 
गाझियाबाद : ( Air India Jolt ) उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरून कोलकाताला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण रविवारी काही तांत्रिक बिघाडामुळे रोखण्यात आले. अलिकडेच अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 विमान कोसळले होते. यामध्ये 275 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
 
विमानतळ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरून जाणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक आयएक्स 1511 तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आले. विमानात उड्डाणाच्या काही सेकंद आधी तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यामुळे टेकऑफ पुढे ढकलण्यात आला. विमान सुमारे एक तास धावपट्टीवर उभे होते. तथापि, या घटनेवर एअर इंडियाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले ( Air India Jolt ) नाही.
Powered By Sangraha 9.0