Promotion Unlocked : पदोन्नतीचा दरवाजा उघडणार ? आयटीआय गटनिदेशकांसाठी महत्त्वाची बैठक !

16 Jun 2025 18:13:04

promotion
 
नागपूर : ( Promotion Unlocked ) गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली आयटीआय गटनिदेशक पदोन्नतीचे ऑर्डर विनाविलंब काढावे, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी निर्देश दिले. आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील आय.टी.आय. निदेशकांच्या विविध प्रलंबित समस्या निवारणार्थ समस्‍या निवारण सभा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे सहसंचालक मोटघरे यांच्यासोबत पार पडली. नागपूर विभागातील आय.टी.आय. निदेशकांच्या विविध प्रलंबित समस्या निवारणार्थ समस्‍या निवारण सभेत सहसंचालक यांनी २० जून २०२५ पूर्वी पदोन्नतीचे ऑर्डर काढू, असे आश्वासित केले ( Promotion Unlocked ) आहे.
 
या सभेत LWE plan अंतर्गत नवीन नियुक्त निदेशकाचे थकीत वेतन कायम स्वरूपी तोडगा काढून विनाविलंब अदा करण्यात यावे. तर, दि. ८/३/१९९९ प्रमाणे स्थायी झालेल्या निदेशकांना त्यांच्या मूळ नियुक्ती पासून अभावीत सेवेचा लाभ देताना १२ व २४ वर्षाचे प्रस्ताव एकत्रितरित्या काढावे. तसेच २४ वर्षाचे लाभ देताना एकूण जागेच्या २०% मधून गटनिदेशक यांना वगळण्यात यावे, कच्चा मला पर्याप्त मात्रामध्ये उपलब्ध करून द्यावा, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, विद्यावेतन वेळेवर अदा करण्यात यावे, सेवानिवृत्ती नंतरचे लाभ विनाविलंब ( Promotion Unlocked ) देण्यात यावे.
 
COE /AVTS बंद झालेल्या व्यायवसायाचे वस्तू व मशीन भांडारात जमा करण्यात यावे, निदेशकाचे वार्षिक सीआरची नोंद सर्व्हिस बुक मध्ये घेणे, दुय्यम सर्व्हिस बुक अपडेट करून देण्यात यावे व संस्था स्तरावरील मशीन, टूल्स निर्लेखन दर सहा महिन्यांनी व्हावे आणि तशी निर्लेखित झालेली वस्तू निदेशकाच्या चार्जेसमधून कमी व्हावी, DSR नोंदी चुकीच्या असल्यास स्थानिक प्राचार्य यांनी दुरुस्ती करून देण्यास पुढाकार घ्यावा. तसेच, या सभेमध्ये चर्चा करण्यात आलेले सर्व विषय पुढच्या सभेपर्यंत सुटलेले असावे, असे निर्देश नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले. सर्व प्रलंबित प्रश्‍नांवर सकारात्‍मक चर्चा करून सभेत ठरलेल्‍या नियोजित वेळेत समस्‍या सोडविण्याचे आश्‍वासन सहसंचालक मोटघरे ( Promotion Unlocked ) यांनी दिले.
 
यावेळी प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक भुते, म.रा. आयटीआय निदेशक संघटनेचे राज्‍य मार्गदर्शक विनोद दुर्गपुरोहित, राज्य सहचिटणीस शिवाजी ढुमणे,राज्य सदस्य साहेबराव गुढधे,नागपूर विभागीय अध्यक्ष प्रेमानंद भैसारे, सचिव सचिन माळीचकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बडे, कार्याध्यक्ष अरुण कराळे, उपाध्यक्ष जितेंद्र टोंगे, खजिनदार मुकेश मेश्राम, सहसचिव विपिन मेश्राम, सदस्य धीरज सव्वालाखे, अपील रंगारी, महिला सदस्य माधुरी बालपांडे, माजी अध्यक्ष अविनाश गभणे, माजी सचिव धनंजय पाटील, नागपूर ITI शाखा अध्यक्ष सिद्धार्थ मेहरे श्री.चव्‍हाण, किशोर पाचभाई यांच्यासह नागपूर विभागातील विविध आय.टी.आय. मधून निदेशक,निदेशका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0