Sangh BJP Secrets : भाजप-संघ युती पुन्हा ऐरणीवर ? गडकरी आणि फडणवीसांची गुप्त चर्चा

16 Jun 2025 15:18:14

Sangh BJP Secrets
 
नागपूर : ( Sangh BJP Secrets )  रविवारी रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परीसरात बैठक झाली. बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. संघ परिवारातील सर्व संघटनांची विशिष्ट कालावधीनंतर बैठक होत असते. तीच बैठक रविवारी झाली. ही बैठक विदर्भ प्रांतस्तरीय असली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या बैठकीत भाजपच्या विदर्भातील सर्व आमदारांना बोलावण्यात आले होते.
 
लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली पिछेहाट व विधानसभा निवडणूकीत संघाच्या पाठबळामुळे मिळालेल्या यश, याचा परिणाम दिसतो आहे. त्यामुळे, आता भाजपच्या प्रत्येक निवडणूकीत संघ त्यांच्या पाठीशी राहील, असे स्पष्ट संकेत रविवारी झालेल्या संघ-भाजप समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आले. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली. तसेच पुढील 90 दिवसात प्रत्यक्ष गृहभेटीचा कार्यक्रम ठरविण्यात आला. यात संघाच्या विविध संघटना व भाजप समन्वयाने हे काम करणार ( Sangh BJP Secrets ) असल्याची माहिती आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आगामी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांना प्रचारासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या काळात घरोघरी संपर्क करून पक्षाच्या कार्याचा प्रसार-प्रचार करण्याचे लक्ष्य कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. या बैठकीत संघाने गेल्या 5 वर्षात केलेले सूक्ष्म निरीक्षण आणि त्यानुषंगाने केलेल्या नियोजनावर प्रकाश टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून ( Sangh BJP Secrets ) मिळत आहे.
एकीकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘काय करायचे’ याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर दुसरीकडे संघाकडून आगामी नियोजन ‘कसे करायचे’ ? या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या समन्वय बैठकीत भाजप कार्यकर्त्यांच्या अपूर्ण कामांवरून नाराजी व्यक्त करण्यात आली. गडकरी आणि फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना त्यांच्या कामातील उणिवांची जाणीव करून देत कानपिचक्या देण्यात आल्या.
 
राज्य शासनाने आगामी महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभागरचना करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली. संघाच्या विदर्भातील जवळपास 32 संघटनांचे प्रमुख या बैठकीला हजर होते. या संघटनांचे विविध प्रकल्प हे राज्य शासनाच्या समन्वयाने सुरू असतात. आगामी काळातील विविध कार्यक्रमांचे नियोजन आणि त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत, यावरही चर्चा करण्यात आल्याची ( Sangh BJP Secrets ) माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
 
या बैठकीला महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, राजू तोडसाम, आमदार संजय कुटे, आमदार समीर कुणावार, डॉ. मिलींद नरोटी, आमदार सुमित वानखेडे, माजी खासदार हंसराज अहीर, आमदार आशीष देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके यांच्यासह इतरही आमदार उपस्थित होते. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दीपक तामशेट्टीवर, राम हरकरे, अतुल मोघे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी ( Sangh BJP Secrets ) उपस्थित होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0