PalmMystery : हातातील 'ही' रेषा सांगते, तुम्ही करोडपती होणार ?

17 Jun 2025 07:18:01

palm 
 
हस्तरेषा शास्त्रानुसार ( PalmMystery ), एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या रेषा आणि चिन्हे पाहून व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि आयुष्याबद्दल जाणून घेता येते. हातामध्ये अनेक रेषा आहेत, ज्यात मुख्य म्हणजे धनरेषा, जीवनरेषा, हृदयरेषा आणि विष्णुरेषा. येथे आपण विष्णू रेखाबद्दल बोलणार आहोत. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या हातात विष्णू रेखा असते त्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा असते. यासोबतच त्यांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात. विष्णू रेखाबद्दल आज आपण जाणून घेऊया.
 
विष्णू रेखा कुठे आहे ?
 
हस्तरेषा शास्त्रानुसार ( PalmMystery ) जेव्हा व्यक्तीच्या हातातील हृदय रेषेतून एखादी रेषा बाहेर पडून गुरु पर्वतावर जाते. ही हृदयरेषा दोन भागात विभागली गेली तर तिला विष्णुरेषा म्हणतात. ज्यांच्या हातात विष्णूरेखा आहे, त्यांना सौभाग्य लाभलेले मानले जाते. असे मानले जाते की भगवान विष्णू अशा लोकांचे नेहमी रक्षण करतात. अशा लोकांचा स्वभाव अत्यंत निर्भय असतो. सर्वात मोठा शत्रू त्यांचे नुकसान करू शकत नाही. त्याचबरोबर ते आयुष्यात नाव आणि पैसा दोन्ही कमावतात.
 
असीमित यशप्राप्ती
 
ज्या लोकांच्या हातात विष्णूरेखा असते, त्यांना आयुष्यात खूप यश मिळते. त्यांना क्षेत्रात मोठे स्थान मिळते. समाजात खूप आदर मिळतो. असे लोक त्यांच्या आयुष्यात खूप यश मिळवतात. तसेच, या लोकांना महागड्या वस्तू खरेदी करण्याचा छंद असतो. त्यांची आर्थिक स्थिती नेहमीच मजबूत आणि सक्षम असते.
 
प्रचंड इच्छाशक्ती
 
हस्तरेषा शास्त्रानुसार ( PalmMystery ) ज्या लोकांच्या हातात विष्णू रेषा असते, असे लोकं धैर्यवान आणि निडर असतात. त्याचबरोबर हे लोकं प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातात. समाजातही ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. तसेच, हे लोकं मनमोकळे आणि स्पष्टवक्ते असतात. ते ज्या ध्येयाचा विचार करतात ते साध्य केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्याच्या अपार इच्छाशक्तीचा वावर असतो.
Powered By Sangraha 9.0