चेन्नई : ( Newborn Baby Incident ) तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात नर्सच्या निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. मल्लीपलयम गावातील रहिवासी विमलराज यांनी आपल्या गर्भवती पत्नी निवेथाला प्रसूतीसाठी वेल्लोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. काही तासांनंतर या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी असल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने ग्लुकोज देण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच ही घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं होत आहे.
ग्लुकोजची सुई पुन्हा बसवताना, संबंधित नर्सने टेप कापण्यासाठी कात्री हातात घेतली आणि तीने ती टेप कापण्याऐवजी तीने नवजात बाळाचे बोट कात्रीने कापले. काही तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाचे बोट कैचीने कापले. पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, या वेळी नर्स मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होती. त्यामुळेच ही गंभीर चूक घडली आहे. नवजात बाळाच्या वडिलांनी सांगितले की, या घटनेनंतर जवळपास दीड तास त्यांना त्यांच्या बाळाला पाहण्याचीही परवानगी दिली गेली नव्हती. ही घटना 24 मे रोजी घडली असून, सध्या या प्रकरणाची ( Newborn Baby Incident ) चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर वेल्लोरमधील रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. जखमी नवजात बाळाला तातडीने चेन्नई येथील स्टॅनली रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्या नवजात बाळाची प्रकृती स्थिर आहे. वेल्लोरच्या जिल्हाधिकारी सुब्बुलक्ष्मी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नर्स फोनवर बोलत असल्याचे सिद्ध झाले, तर तिच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच, या प्रक्रियेसाठी कात्रीची आवश्यकता नव्हती, ती काळजीपूर्वक ( Newborn Baby Incident ) हातानेही काढता आली असती.