Teacher Transfer Process : बदल्यांचा ब्लॉकबस्टर घोळ ! शिक्षण खातं अजूनही गप्प का ?

Top Trending News    02-Jun-2025
Total Views |

teacher
 
नागपूर : ( Teacher Transfer Process ) मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेला रोज नवनवीन अडथळ्यांना सामोरे जावं लागत आहे. तास पाहाल तर 31 मे पर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. ही मुदत संपल्यामुळे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार की नाही, असा संभ्रम आता निर्माण झाला आहे. बदली प्रक्रियेकरिता 34 दिवसांचा कालावधी लागणार होता. हे वेळापत्रक गृहीत धरले तर आज जरी प्रक्रिया सुरू झाली तरी बदली प्रक्रिया पूर्ण व्हायला जुलै उजाडेल. विदर्भ वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील शाळा 16 जून रोजी तर विदर्भातील शाळा 23 जून रोजी सुरू होणार आहे. त्यामुळेच आता शाळा सुरू होण्याआधी बदली प्रक्रिया पूर्ण होणे शक्य होणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात ( Teacher Transfer Process )  येत आहे.
 
ग्राम विकास विभागाच्या 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार एकूण 7 टप्प्यात शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 7 नोव्हेंबर 2024 रोजी ग्राम विकास विभागाकडून 28 एप्रिल ते 31 मे असे प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु, पुढे या वेळापत्रकात वारंवार बदल करण्यात आला. प्रशासकीय व तांत्रिक अडचणी आणि न्यायालयीन प्रकरणे यामुळे बदली प्रक्रिया लांबली, हे जरी खरे असले तरी वारंवार बदलणारे निकष, शिक्षण व ग्राम विकास विभागातील असमन्वय आणि प्रशासकीय उदासीनता याबाबीसुद्धा बदली प्रक्रिया लांबण्यासाठी कारणीभूत ( Teacher Transfer Process ) आहेत.
 
ऑनलाईन प्रक्रियेत ( Teacher Transfer Process ) वारंवार निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी, शिक्षक व शिक्षक संघटना यांनी दाखल केलेली न्यायालयीन प्रकरणे व त्याबाबत उच्च न्यायालयाने पारित केलेले आदेश तसेच, जुन्या-नव्या संच मान्यतेबाबतचा संभ्रम या सर्व बाबींमुळे शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेत सातत्याने अडथळे निर्माण झाले. अजूनही संवर्गनिहाय प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात होवू शकली नाही. शासनाने बदली प्रक्रिया तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केली आहे.