Tiger Reserve SOP Violation : एसओपीचा विसर, अधिकारी सुस्त… व्याघ्र पर्यटनात पर्यटकांच्या जीवाशी खेळ ?

02 Jun 2025 17:30:10

tiger res
 
नागपूर : ( Tiger Reserve SOP Violation ) उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील वाघीण आणि बछड्यांचा मार्ग रोखल्याच्या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली आहे. ज्यात पर्यटक, मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णयही अग्रस्थानी आहे. परंतु, आज घटनेच्या पाच महिन्यांनंतर मात्र व्याघ्र सफारीला जाताना मोबाईल नेण्यास बंदी असल्याचा मुद्दा मात्र कुठेही दिसत नाही. अर्थातच वन विभागाला त्यांच्या एसओपीचा विसर पडला का हा प्रश्न निर्माण होतो आहे. वन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. यावेळी व्याघ्र सफारीतील मानक प्रक्रियेतील नियम अधिक कठोर केल्याचे ( Tiger Reserve SOP Violation ) सांगण्यात आले होते.
 
पर्यटकांनी वन्यजीवांचे संवर्धन आणि नैसर्गिक परिसंस्थेच्या संवेदनशीलतेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याची अपेक्षा प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पात प्रवेश करण्यापूर्वीच नियम सांगितले जाणार आहेत. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमधील अतिरिक्त निसर्ग पर्यटनाला आळा घालण्यासाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या एसओपी पेंच, बोर व उमरेड अभयारण्यात लागू करण्याचा निर्णय वन विभागाने ( Tiger Reserve SOP Violation ) घेतला होता.
 
वनविभागाने व्यवस्थापनात केलेल्या सुधारणेमुळे व नव्या उपाययोजनांमुळे प्रकल्पातील नैसर्गिक संतुलन टिकविण्यास मदत होईल. पर्यटकांना जंगल सफारीचा शिस्तबद्ध अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या एसओपीत जंगल सफारीचे नियम, वाहनांचे नियम, आणि पर्यटकांच्या वर्तणुकीसाठी कठोर नियमांचा समावेश होता.
 
नवीन एसओपी
 
- पर्यटकांनी आवाज करणे, कचरा टाकणे, वन्यजीवांना त्रास होईल अशा वागण्यावर बंदी आहे.
- सफारीदरम्यान वाहन व प्राण्यांमध्ये किमान 30 मीटर अंतर आवश्यक, तसेच गती निश्चित असेल.
- वाहन चालक आणि मार्गदर्शकांसाठी विशेष प्रशिक्षण तसेच सुरक्षितता नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असेल.
- अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर ‘डूज अँड डोन्ट्स’चे फलक लावले जाणार आहे.
- क्षेत्रीय अधिकारी व कर्मचा-यांची सफारी मार्गांवरील गस्त वाढविली जाणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0