Digital Campaign : मनपाच्या तोंडावर ‘फेसबुक रणांगण’! भावी नगरसेवकांमध्ये सोशल मीडियावर ब्रॅण्ड वॉर

Top Trending News    21-Jun-2025
Total Views |

 
digi
 
नागपूर : ( Digital Campaign ) महापालिका निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्याला काहीच काळ उरला आहे. अशात त्या कालावधीपर्यंत आपण मतदारांपर्यंत वा आपल्या भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठीची चढाओढ सुरू झाली आहे. अशातच अनेक तरूण इच्छुक चित्रपटातील हिरोंसारखे आपले चित्रीकरण करून घेत ओहत. तशा क्लीप्स तज्ज्ञांकडून तयार करून घेत आहेत. यासाठी जास्त खर्च पडत नसल्याने व कमी वेळेत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य असल्याने धावपळ सुरू आहे.
 
पुढील काळ सोशल मीडियाचा असल्याने अनेकांनी यावेळी त्याचा शक्य तो जास्त वापर करण्याची तयारी केली आहे. यासाठी मोबाईलमधून नागरिकांशी संवाद व काम केल्याच्या छोट्या क्लीप्स सेव्ह केल्या जात आहे. शिवाय, स्वत:ची ब्रॅण्डींग करण्यासाठी छोट्या मोठया कंपन्यांकडे धावही घेतली जात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा जोरदार वापर केला होता. आजच्या आधुनिक काळात प्रचाराचा सर्वात सोपा व वेगवान माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे ( Digital Campaign ) बघितल्या जाते.
 
काही मिनीटातच आपला प्रचार करून ओळख करून देण्याची किमया या माध्यमात आहे. आज सर्वांकडेच मोबाईल असल्याने हा सोप्पा मार्ग इच्छुकांकडून अवलंबिला जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आपल्या निवासी भागातील ओळखीच्या नागरिकांचे मोबाईल क्रमांक अनेकांनी घेऊन ठेवले होते. शिवाय, आपण उमेदवार असल्याचे दाखवून अनेकांनी प्रभागांमध्ये फिरून स्वत:चा प्राथमिक प्रचारही केला होता. या काळात नागरिकांनी इच्छुकांचा मोबाईल नंबर घेतला व स्वत:चा नंबरही दिला आहे. असे सर्व मोबाईल नंबर इच्छुकांकडून संग्रहित करण्यात आले. स्वत:कडे असलेल्या रजीस्टरवर नाव व मोबाईल क्रमांक नोंदवून ( Digital Campaign ) घेतले गेले आहेत.
 
त्यामुळे काहीच मिनिटात अशा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा वापर अत्यंत फायद्याचा होणार आहे. अनेकांनी प्रभागात फिरताना तसेच काम सुरू असताना आपण हजर राहून काही निर्देश देत असल्याच्या व्हिडीओ क्लीप तयार करून घेतल्या आहेत. तर, अनेकांनी स्वत:ची ओळख करून देणारी ब्रॅण्डींगची नव कल्पनाही साकारली आहे. ती अत्यंत दर्जेदार व लोकप्रिय व्हावी, यासाठी काही तज्ज्ञ माध्यमकर्त्यांचीही मदत घेतली आहे. गेल्या पंधरवड्यात अशा अनेकांनी शहरातील छोट्या मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधल्याची माहिती ( Digital Campaign ) आहे.
 
व्हॉट्सअॅप ग्रुपचा धुमाकूळ
 
भावी नगरसेवक व इच्छुक असलेल्यांनी यावेळी लढायचेच असे ठरवून कामाला लागले आहेत. त्यापूर्वी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असल्याने प्रभागातील नागरिकांची ओळख व परिचय आहेच. अशा नागरिकांचे त्यांनी व्हॉट्अप समूह तयार केले आहे. त्यांना नियमितपणे आपले व्हिडीओ क्लीप्स व ब्रॅण्डींगची चित्रफीत पाठविण्यास सुरूवात केली आहे. मतदार म्हणून प्रभागात राहणाऱ्या विविध समाजघटकांचे वेगवेगळे व्हॉट्सअॅप समूहही तयार करण्यात आले. त्यांना त्यांच्या विचारधारेशी निगडीत तसेच त्यांना आवडेल अशा व्हिडीओ क्लीप्स पाठविण्यात येत आहे. जेणेकरून अशा विविध समाजघटकाशीही आपली प्रतिबध्दता ( Digital Campaign ) असल्याचे भासवून देण्याचा प्रयत्न आहे.