नागपूर : ( Guru Asta ) ज्योतिषशास्त्रानुसार गुरु किंवा शुक्र ग्रह अस्त होण्याच्या काळात मांगल्य कार्य करणे टाळले जाते. आषाढी एकादशीच्या निमित्तानेही या काळात शुभकार्य वर्ज्य राहणार आहेत. त्यामुळे आता वधु-वरांच्या पालकांना लग्न तिथी ठरविण्यासाठी 5 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. 12 जून रोजी रात्री 11:30 वाजता गुरु अस्त झाला. 5 जुलैला गुरु पुन्हा उदित होणार असून, 6 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आहे. चातुर्मास काळात देखील शुभकार्य बंद असते. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत म्हणजे तब्बल 5 महिने शुभकार्यांना विश्रांती मिळणार ( Guru Asta ) आहे.
पंचांगामध्ये 9 जूनपर्यंत विवाहासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध होते. ग्रहांच्या गणनेनुसार आणि गुरु अस्तामुळे लग्नासाठी शुभ तिथींची कमतरता जाणवत आहेत. या काळात पालकांनी संयम दाखवून योग्य वेळेची प्रतीक्षा करावी, असे ज्योतिषशास्त्र सांगत आहेत. गुरु अस्त होण्यापूर्वी 11 जूनपर्यंत अनेक शुभकार्य झाले. मात्र, जून महिन्याचा मोठा भाग लग्नशिवाय जाणार आहे. जूनमध्ये केवळ 5 शुभ मुहूर्त ज्योतिषशास्त्रानुसार उपलब्ध होत आहेत. या आधी एप्रिल-मे महिन्यांत लग्नांची गर्दी होती, पण हे प्रथमच घडले आहे की, जून महिन्याचा जास्त भाग लग्नाशिवाय जात आहे.
15 नोव्हेंबर नंतर शुभ मुहूर्त
देवशयन कालखंड 6 जुलै पासून 1 नोव्हेंबरपर्यंत आहे. 2 नोव्हेंबरला तुळशी विवाह असला तरीही पंचांगांमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त फक्त 15 नोव्हेंबरनंतर दिसत आहेत. 15 डिसेंबरनंतर पुन्हा शुभकार्यांवर विराम लागणार आहे. गुरु, शुक्र अस्त किंवा देवशयन काळात भूमिपूजन, उद्घाटन, गृहप्रवेश, मूर्ती स्थापना, उपनयन संस्कार, यांसारख्या शुभकार्यावर कार्यांवर बंदी असते. पंचांग, ज्योतिषशास्त्र व मुहूर्तांवर विश्वास असलेल्या पालक आणि आयोजक ग्रहस्थितींच्या आधारेच विधी-विधान ( Guru Asta ) करतात.
ग्रह अस्तावस्थेत ऊर्जा असंतुलित असते, त्यामुळे शुभकार्यांना स्थगिती ही आवश्यक प्रक्रिया आहे, गुरु अस्त आणि देवशयन कालखंड यामुळे सृष्टीत मांगल्य स्थिरावते, म्हणून शुभ कार्य थांबतात. ग्रहांची अस्थावस्था म्हणजे ऊर्जा शिथिलतेचा काळ, त्यामुळे विवाह, गृहप्रवेश यांसारखे मंगल कार्य टाळले जातात. हा काळ आत्ममंथन, साधना आणि योग्य नियोजनासाठी उपयुक्त असतो. पालकांनी आणि आयोजकांनी पंचांग आणि ग्रहस्थितीचा सन्मान ठेवून योग्य काळाची वाट पहावी. कारण वेळ आणि मुहूर्त योग्य असेल तेव्हाच कार्य फलदायी ( Guru Asta ) ठरते.
- ज्योतिषाचार्य आचार्य भूपेश गाडगे, नागपूर